---Advertisement---

उपांत्य फेरीतील पराभवाचा धक्का की दुसरे कारण? स्मिथच्या अचानक निवृत्तीमागचे गूढ समोर

On: बुधवार, मार्च 5, 2025 1:17 PM
Steve Smith
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्मिथच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्याने कर्णधारपदातही स्वतःला सिद्ध केले आहे. पण आता त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.  यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्मिथने ही घोषणा केली. स्मिथने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. (Steve Smith ODI Retirement News)

निवृत्तीनंतर प्रतिक्रिया देताना स्मिथ म्हणाला की, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक आठवणी गोळा केल्या आहेत. स्मिथ अचानक का निवृत्त झाला याबद्दल त्याने काहीही स्पष्ट सांगितले नाही. पण स्मिथने निश्चितपणे सांगितले की तो तरुण खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सांगण्यानुसार, स्मिथ म्हणाला की आता इतर खेळाडूंना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी करण्याची चांगली संधी आहे. स्मिथला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. (Steve Smith statement after ODI Retirement)

भारताविरुद्धचा पराभव विसरणे स्मिथसाठी सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण इथे त्याला ४ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात स्मिथला फक्त 19 धावा करता आल्या. इंग्लंडविरुद्ध 5 धावा केल्यानंतर तो बाद झाला.

स्टीव्ह स्मिथने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन संघात लेगस्पिनर म्हणून प्रवेश केला होता. मात्र, त्याची फलंदाजीतली गुणवत्ता ओळखली गेली आणि तो संघाचा मुख्य फलंदाज बनला. त्याच्या तंत्रावर बरीच टीका झाली, पण मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केले. त्याच्या अनोख्या फलंदाजी शैली आणि स्थिर मानसिकतेमुळे तो ऑस्ट्रेलियाच्या यशाचा प्रमुख भाग बनला.

स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 170 वनडे सामने खेळले असून, 5800 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 12 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या दमदार खेळीने ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. त्याचा वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर 164 धावा आहे. (Steve Smith Career Stats)

हेही वाचा-

मोठी बातमी.! स्टीव्ह स्मिथची आंतरराष्ट्र्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
दुबईमध्ये टीम इंडियाला नमवणे अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला मोठा विक्रम
रोहित शर्माचा ऐतिहासिक विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव कर्णधार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---