भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या टी२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका आटोपल्यानंतर वॉर्म-अप सामन्यासाठी मुंबईला पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना आज (४ फेब्रुवारी) डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे, त्याआधीच भारतीय संघाचे सर्व खेळाडू कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानत आहे.
सूर्यकुमारने असे काही केले ज्यामुळे संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांचे धन्यवाद मानताना थकत नाहीये. त्यामागे एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याने सर्वांना दिलेली एक वस्तू. जी खेळाडूंनी स्विकार करत त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेयर करत त्याचे आभार मानले आहे.
सूर्यकुमारने खेळाडूंना परफ्युम भेट म्हणून दिला आहे. भारतीय खेळाडूंची इंस्टा स्टोरी पाहिली तर सूर्यकुमार त्या परफ्युम ब्रॅंडसोबत भारतीय व्यवसायात उतरत आहे, असे दिसत आहे. त्यामुळेच खेळाडू त्याला धन्यवाद म्हणताना त्याचे अभिनंदनही करत आहेत. यामध्ये अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, टी दिलीप, अक्षर पटेल, तिलक वर्मा यांचा समावेश आहे. आणखी काही जणांनीही त्याचे आभार मानले आहे.
“सध्याचा भारतीय टी२० संघ सर्वोत्तम संघांपैकी एक आहे”, असे विधान भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी याने केले आहे. भारताच्या या संघांची मागील टी२० मालिकांमधील कामगिरी पाहिली तर धोनीचे हे विधान काही खोटे नाही.
नुकतेच याच संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असे पराभूत केले आहे. त्यामध्ये भारतीय फलंदाजी-गोलंदाजी उत्तम झाली. यामुळे आता भारतीय खेळाडूंबरोबर चाहतेही लवकरच सूर्यकुमारचे अभिनंदन करत त्याला धन्यवाद म्हणतील, जेव्हा तो संघाला टी२० विश्वचषक जिंकून देईल.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला युएसए विरुद्ध आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषक २०२६साठी भारतीय संघ खालीलप्रमाणे,
सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.






