क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स राखून भारताचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. या सामन्यात भारताकडून विराट कोहली याने धडाकेबाज प्रदर्शन केले. परंतु तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला नव्हता. यामागचे कारण काय होते?
तर विराट पाकिस्तानच्या डावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना विराटच्या उजव्या पायाचे स्नायू ताणले गेले होते. हा संपूर्ण प्रसंग पाकिस्तानच्या डावातील सातव्या षटकादरम्यान घडला होता. या षटकात फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने लाँग ऑफला शॉट मारला होता. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने चौकार अडवण्यासाठी डाईव्ह मारली आणि चेंडू त्याच्या हातून निसटून सीमारेषेपलीकडे गेला.
यादरम्यान विराटच्या उजव्या पायाला त्रास जाणवला. त्यानंतर त्याने 3-4 षटके क्षेत्ररक्षण केले. त्याने या षटकांमध्ये फखर जमानचा झेलही घेतला. परंतु नंतर त्याचा त्रास वाढल्याने तो मैदानाबाहेर गेला होता.
फलंदाजीत चमकला विराट
भारताचा विश्वासाचा फलंदाज विराट कोहली ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बराच आऊट ऑफ फॉर्म होता. त्याने या स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 धावा केल्या होत्या. यावरून तो फॉर्ममध्ये परतला असे म्हटले जाऊ लागले होते. त्यानंतर आता सुपर-4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 60 धावा करत त्याने जुना रंग दाखवला. 44 चेंडू खेळताना 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच भारतीय संघ 181 धावांपर्यंत मजल मारू शकला.
भारतासाठी कठीण बनली अंतिम सामन्याची समीकरणे?
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भारताला त्यांचे सुपर-4 फेरीतील दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर भारताने दोनपैकी एकही सामना गमावला, तर त्यांच्यावर आशिया चषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्ध सामना गमावल्यानंतरही विराटच आहे टी20चा किंग, कॅप्टन रोहितला टाकले मागे
भारताविरुद्ध बाबर आझमचा प्लॅन यशस्वी, सांगितले नवाजला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे कारण
प्रेक्षक बनले दीपक हुड्डाचे चाहते, पाहा पाकिस्तानविरुद्ध मारलेला जबरदस्त अप्पर कट