---Advertisement---

15 वर्षांच्या वैभवकडे का सोपवली उपकर्णधारपदाची धुरा? निवडकर्त्यांनी स्पष्ट केलं कारण, म्हणाले…

On: गुरूवार, जुलै 30, 2026 9:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोनकडून खेळताना दिसेल. या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. कारण वैभवला रेड बॉल क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नाही. असं असतानाही त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान निवडकर्त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इशान किशनची ईस्ट झोनचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर त्याचा उत्तराधिकारी म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ईस्ट झोन निवड समितीचे सदस्य प्रभंजन मल्लिक यांनी वैभव सूर्यवंशीला उपकर्णधार का बनवलं, यामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले, “त्याला कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. तो फक्त उपकर्णधार आहे. ईशान किशन संघाचं नेतृत्व करणार आहे. याशिवाय, ईशान हा यष्टिरक्षक असल्याने तो दिवसभर मैदानात सक्रीय असेल. जसजसा तो मोठा होत आहे, तसतसा तो अधिक मॅच्युअर होत आहे. त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवल्यास तो आणखी परिपक्व होण्यास मदत होईल.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “दुलीप ट्रॉफीत उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही त्याच्यासाठी उत्तम संधी आहे. त्याला देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे आणि तरुण खेळाडूंवर जबाबदारी सोपवणे महत्त्वाचे आहे. कोणास ठाऊक, एक दिवस तो भारताचा कर्णधारही बनू शकतो. हीच आशा आम्ही बाळगून आहोत, त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो देशासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठीही चांगली कामगिरी करतोय. यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बिहारचा उपकर्णधार देखील आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---