---Advertisement---

WIvsZIM: वानखेडे स्टेडियमवर होणार षटकारांचा पाऊस! वेस्ट इंडिजचा ‘मॅचविनर’ दुखापतीतून सावरला

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 4:20 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८च्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये आज (२३ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याला संध्याकाळी सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी वेस्ट इंडिजला आनंदाची वार्ता मिळाली आहे. त्यांचा अष्टपैलू रोमारियो शेफर्ड त्याच्या दुखापतीतून सावरला आहे. यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

मागील आठवड्यात मैदानाबाहेर झालेल्या शेफर्डने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी नेटमध्ये चांगलाच सराव केला. त्याने गुडघ्याला पट्टी बांधत वानखेडे स्टेडियमवर षटकार मारले. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक डॅरेन सॅमीने तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले आहे. शेफर्डने स्कॉटलंड विरुद्ध हॅट्ट्रीक घेत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मागील दोन सामन्यांना तो दुखापतीमुळे मुकला होता. यामुळे आता तो संघात परतला असून मॅथ्यू फोर्डची जागा घेण्याची शक्यता आहे.

सॅमीने या स्पर्धेत झिम्बाब्वेने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, असाही ईशारा दिला आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेमध्ये ४ टी२० सामने खेळले गेले. त्यामध्ये वेस्ट इंडिजने ३ सामने जिंकले आहेत.

हा सामना त्याच खेळपट्टीवर खेळला जाणार ज्यावर भारत विरुद्ध यूएसए सामना खेळला गेला. विशेष म्हणजे १६ वर्षाआधी झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला एका टी२० सामन्यात पराभूत केले होते. त्यामध्ये सॅमीही खेळला होता. तसेच त्याने सुपर-८साठी झालेल्या सीडिंग सिस्टमबाबत लॉजिस्टिकनुसार चाहत्यांसाठी हे योग्य आहे, मात्र संघांसाठी मैदानावर चांगले प्रदर्शन करण्याचे आव्हान असते, असे वक्तव्य केले आहे.

वेस्ट इंडिज त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आधीच कर्णधार शाय होप आणि शिमरन हेटमायर विरोधी संघांना षटकार मारून त्रास देत आहेत, आता त्यामध्ये शेफर्डही सामील झाला असून वेस्ट इंडिजची ताकद दुप्पट झाली आहे. अशातच या सामन्यात षटकारांचा पाऊस पडणार हे नक्कीच.

या स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दोघेही अपराजित आहेत. तसेच झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढण्यात मोठी भुमिका बजावली होती. दोन्ही संघ तुलनेने सारखेच असून हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---