इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने असे काही केले आहे, जेणेकरून त्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना इंग्लंडने पहिल्या डावात १० विकेट्स गमावत ३११ धावा केल्या. यात जॉनी बेअरस्टोने २१ चौकारांसह सर्वाधिक १४० धावा कुटल्या. इंग्लंडने दिलेले हे आव्हान वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा डाव संपेपर्यंत ४ विकेट्स गमावत २०२ धावा कुटल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला होता. त्याचवेळी मार्क वूडने (Mark Wood) असे काही रिऍक्शन दिले, ज्यामुळे त्याला पाहून सगळेच हसायला लागले.
मार्क वूडच्या रिऍक्शनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कदाचित असे दृश्य पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाल असेल.
Mark Wood created his own huddle. pic.twitter.com/9mVNCdBFU4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 10, 2022
वूडने आपल्या १२ षटकांच्या गोलंदाजीत १ विकेट घेतली. ही विकेट खूपच महत्त्वाची होती. कारण, त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटला ५५ धावांवर तंबूत धाडलं होतं.
वेस्ट इंडिजचे जबरदस्त प्रत्युत्तर
जेसन होल्डर आणि एनक्रूमा बोनेरने वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीच्या धक्क्यांमधून बाहेर काढत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ४ विकेट्सच्या बदल्यात २०२ धावांवर पोहोचवले होते. दोघांमध्ये आतापर्यंत ७५ धावांची भागीदारी झाली आहे. एकेवेळी वेस्ट इंडिज संघ ४ विकेट्सवर १२७ धावांवर गमावले होते. दोघांनीही कोणतीही जोखिम न घेता, इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. इंग्लंड संघ अजूनही १०९ धावांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर होल्डर ४३ आणि बोनेर ३४ धावांवर खेळत होता. पावसामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळ वेळेपूर्वीच समाप्त करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला विश्वचषक: हरमनप्रीतची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभव
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट