---Advertisement---

दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा! यशस्वी-रोहितच्या शानदार शतकानंतर 2 मोठे धक्के, संघाकडे 162 धावांची आघाडी

Rohit-Sharma-And-Yashasvi-Jaiswal-TEST
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. डॉमिनिका कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय संघाने आपल्या नावावर केला. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजला 150 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावाच्या जोरावर 162 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघाकडून दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल यांनी शतक ठोकले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने 2 विकेट्स गमावत 312 धावा चोपल्या होत्या. यशस्वी 143 आणि विराट कोहली 36 धावांवर नाबाद राहिले.

पहिल्या सत्रात चमकले यशस्वी आणि रोहित
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा (Yashasvi Jaiswal And Rohit Sharma) यांनी सांभाळून डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. दोघांनीही संघाची धावसंख्या 100च्या पार नेली. यादरम्यान यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने पहिले अर्धशतकही पूर्ण केले. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटीतील 15वे अर्धशतक साकारले. त्यानंतर लंच ब्रेकपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 146 धावा केल्या होत्या. पहिल्या सत्रात भारताने एकूण 66 धावा केल्या.

दुसऱ्या सत्रात 2 धक्क्यांसह सलामीवारांचे शतक
लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होण्यासोबतच सलामीवीरांनी धावांची गती वाढवली. यादरम्यान जयसवालने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. तसेच, त्याने स्वत:चा खास क्लबमध्येही समावेश केला. यासोबतच कर्णधार रोहित आणि यशस्वी यांच्यात 200 धावांची भलीमोठी भागीदारीही झाली.

याच सत्रात रोहितनेही आपले 10वे कसोटी शतक पूर्ण केले. मात्र, तो शतक केल्यानंतर फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो 103 धावा करून तंबूत परतला. भारतीय संघाला यावेळी 229 धावांवर पहिला धक्का सहन करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या स्थानी शुबमन गिल (Shubman Gill) फलंदाजीला उतरला. मात्र, विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा गिल यावेळी फक्त 6 धावा करून तंबूत परतला. दुसऱ्या सत्राचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 245 होती.

शेवटच्या सत्रात यशस्वी आणि विराटकडून संघाची आघाडी 150च्या पार
दिवसाच्या अखेरच्या सत्रात यशस्वी जयसवाल आणि विराट कोहली (Yashasvi Jaiswal And Virat Kohli) यांनी यजमानांच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. दोघांनीही सांभाळून फलंदाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. तसेच, दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाची धावसंख्या 312पर्यंत पोहोचवली. आता भारताकडे पहिल्या डावाच्या आधारावर 162 धावांची आघाडी आहे.

यशस्वी 143, तर विराट 36 धावांवर नाबाद आहेत. तसेच, वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या दिवशी ऍलिक अथानाझे आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (WI vs IND 1st test day 2 india at 312 runs and lead by 162 runs yashasvi jaiswal and Virat Kohli Not Out)

महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! विराटकडून सेहवागचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त, ‘त्या’ खास यादीत पटकावला पाचवा क्रमांक

यशस्वीनंतर रोहितचाही शतकी धमाका! टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---