---Advertisement---

तिलक वर्माने घेतली कारकिर्दीतील पहिली आंतरराष्ट्रीय विकेट, फलंदाजाच्या रूपातही केली होती मोठी कामगिरी

Tilak Varma
---Advertisement---

तिलक वर्मा याच्यासाठी भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा खास राहिला आहे. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कारकिर्दीतील पहिल्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिलकला गोलंदाजीचा संधी मिळाली नाही. पण रविवारी (13 ऑगस्ट) त्याला संधी मिळताच अष्टपैलून त्याचे सोने केले.

वेस्ट इंडीजविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी फ्लॉरिडामध्ये खेळला गेला. सामन्यातील 14व्या षटकात तिलक वर्मा गोलंदाजीला आला. तिलकच्या कारकिर्दीतील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय षटक असून दुसऱ्याच चेंडूवर त्याने निकोलस पुरन याची विकेट घेतली. आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट निकोलस पुरन याच्या रुपात मिळवल्यानंतर तिलकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे तिलकने फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुरऱ्या चेंडूवर षटकार मारला होता. तर गोलंदाज म्हणून दुसऱ्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली आहे.

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकली होती. पण कर्णधाराने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय फसल्याचे दिसले. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी एकडा सूर्यकुमार यादव अर्धशतक करू शकला. सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. निर्धारित 20 षटकांमध्ये भारतीय संघ 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरत वेस्ट इंडीजने हे लक्ष्य 8 विकेट्स राखून गाठले. सलामीवीर ब्रँडन किंग याने 55 चेंडूत 85 धावांची वादळी खेळी केली.

उभय संघांतील ही मालिका पाच सामन्यांची होती. पहिल्या दोन सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने, तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. रविवारी हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मालिकेतील तिसरा पराभव स्वीकारावा लागाल. याचसोबत मालिका वेस्ट इंडीजने 3-2 अशा अंतराने नावावर केली. (Tilak Varma picks his maiden International wicket in his 2nd ball.)

महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तान संघाला लाभला भारतीय गुरु! तब्बल 32 वर्षांचा अनुभव करणार शेअर
वेस्ट इंडीज दौऱ्यावर संजू पूर्णपणे फ्लॉप! खराब कामगिरीने पुन्हा आला चाहत्यांच्या निशाण्यावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---