---Advertisement---

वनडे शतक करण्यापासून थोडक्यात चुकला गिल, तर चर्चा रंगतीये आरसीबीची

shikhar-gill
---Advertisement---

भारताचा सलामीवीर शुबमन गिलने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाने वनडेतही तो धावा काढण्यात पटाईत आहे हे सिद्ध केले आहे. या मालिकेआधी त्याला फक्त ३ वनडे सामन्यांचा अनुभव होता. यातही तो ९, ७ आणि ३३ धावा करू शकला होता. यामुळे वेस्ट इंडिजचा दौरा त्याच्यासाठी खास ठरला आहे. मात्र त्याच्या या कामगिरीची चर्चा होत असतानाच सोशल मीडियावर अजून एक बाब चांगलीच व्हायरल झाली आहे.

शुबमन गिल (Shubman Gill) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने ३ सामन्यात १०२.५०च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत. या प्रदर्शनामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र यावेळी त्याची नाही तर आरसीबीची अधिक चर्चा होत आहे.

झाले असे की, पावसामुळे सामना ४० षटकांचा खेळला गेला. यामुळे भारत पूर्ण ५० षटके खेळू शकला नाही. याच कारणास्तव गिल त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतक करण्यास मुकला. तो ९८ धावा करत नाबाद राहिला. दुसरीकडे आयपीएलचा (इंडियन प्रीमियर लीग) संघ रॉयल चॅलेजर्स बेंगलोरने त्याला शतक केल्याने ट्वीट करत त्याचे अभिनंदन केले. बेगंलोरने चूक लक्षात येताच ट्वीट डिलीट केले. तर एका चाहत्याने बेंगलोरच्या या ट्वीटचा स्क्रिनशॉट टाकला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारताने नाणेफेक जिंकताना ३६ षटकात ३ विकेट्स गमावत २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने २६ षटकात सर्वबाद १३७ धावा केल्या. हा सामना भारताने डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार ११९ धावांनी जिंकत मालिका ३-० अशी जिंकली. भारतीय संघ या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळला.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला सामना २९ जुलै, शुक्रवारी खेळला जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा हा भारताचे कर्णदारपद सांभाळणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘एक षटक मिळाले असते…’, कारकिर्दीतील पहिले शतक हुकल्यानंतर शुबमन गिलने दिली प्रतिक्रिया

VIDEO: खरंच सांगतोय, असा चौकार तुम्ही कधीच पाहिला नसेल

जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---