माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम हे अष्टपैलू शार्दुल ठाकूर याच्या भारतीय संघातील भूमिकेबद्दल भ्रमित आहे. सबा करीम यांच्या मते शार्दुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील करण्यामागचे कारण त्याच्या फलंदाजीत खोली आणणे हे होते. परंतु तो असे करण्यात अयशस्वी ठरला. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत (ODI Series) गोलंदाजी करताना त्याने ७ विकेट्स घेतल्या. परंतु फलंदाजीत तो फक्त १० धावा करू शकला. दुसऱ्या वनडे सामन्यात शार्दुलकडून फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदानाची गरज होती. परंतु तो केवळ ३ धावांवर बाद झाला आणि त्याने संघाला कठीण परिस्थितीत सोडले. त्यानंतर अक्षर पटेलच्या झटपट खेळीमुळे भारतीय संघ हा सामना जिंकू शकला होता.
इंडिया न्यूजवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेबद्दल चर्चा करताना सबा करीम (Saba Karim) शार्दुलच्या (Shardul Thakur) भूमिकेबद्दल बोलले. ते म्हणाले की, “शार्दुलसाठी गोलंदाजीच्या दृष्टीने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका खूप शानदार राहिली आहे. परंतु मला वाटते की, त्याला त्याच्या संघातील भूमिकेबद्दल स्पष्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्याला एका अष्टपैलूच्या रूपात पाहिले जाते. त्यामुळे संघातील जागेसाठी त्याला काट्याची प्रतिस्पर्धा असून त्याला दोन्ही विभांगामध्ये योगदान द्यावे लागणार आहे.”
पुढे बोलताना सबा करीम यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचे वनडे क्रिकेटमधील शानदार पुनरागमनासाठी कौतुक केले आहे. त्याच्याबद्दल बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू करीम म्हणाले की, “सिराज गोलंदाजी विभागात खूप सकारात्मक राहिला आहे. त्याच्या मागील काही सामन्यातील प्रदर्शनाला पाहता तो भारताच्या वनडे संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवू शकणार नाही असे वाटत होते. परंतु त्याने जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने चेंडूला पुढच्या बाजूला स्विंग केले. तसेच अंतिम षटकात शानदार यॉर्कर फेकले.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित आणि द्रविडने स्वत: जाऊन खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटशी बोलायला पाहिजे”
तुला माही म्हणू की माही भाई? जेव्हा उथप्पाने धोनीलाच विचारला होता प्रश्न; मिळाले होते असे उत्तर
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…