भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. अशात न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार स्कॉट स्टायरिशने गिलविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टायरिशच्या मते गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये जितके जास्त सामने खेळेल तिककीच त्याची सरासरी सुधारेल. स्टायरिशच्या मते असे खूप कमी लोक आहेत, जे शुबमन गिलचे त्याच्यापेक्षा मोठे चाहते असतील.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) याने उत्कृष्ट प्रदर्शन करत वैयक्तिक अर्धशतक केले होते. या प्रदर्शनानंतर सर्वजण गिलचे कौतुक करत आहेत. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील गिलने अप्रतिम फलंदाजी केली. अशातच न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्कॉट स्टायरिश (Scott Styris) यानेही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शुबमन गिलविषयी बोलताना स्टायरिशला प्रश्न विचारले गेला की, दुसऱ्या सामन्यातील गिलचे प्रदर्शन पाहता शिखर धवनवरील दबाव वाढला असेल का?
या प्रश्नाला उत्तर देताना स्टायरिश म्हणाला की, “जेव्हा गिल भारतासाठी वरच्या फळीत तेव्हा मी अपेक्षा करतो की, त्याची सरासरी खूप चांगली असेल. कारण तो खूप क्लास खेळाडू आहे. खूप कमी लोक आहेत, जे शुबमन गिलचे माझ्यापेक्षा मोठे चाहते आहेत. मागच्या काही वर्षात मी गिलविषयी खूप काही बोललो आहे. माझ्या मते त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, ज्यामुळे तो जगातील उत्कृष्ट फलंदाज बनू शकतो.”
दरम्यान, भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याचा विचार केला, तर एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात गिलने ५३ चेंडू खेळून ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ३ धावांनी जिंकलेला. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गिलने ४३ धावा केल्या. त्याने आतापर्यंत एकूण ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये १५६ धावांची नोंद त्याच्या नावापुढे झाली. यादरम्यान, गिलने एक अर्धशतक केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
टी-२० विश्वचषक २००७ गाजवणारा भारताचा हिरो, आता ‘या’ स्पर्धेतही चमकणार?