वेस्ट इंडीजविरुद्धचे शेवटचे दोन टी-२० सामने खेळायचे बाकी आहेत. खेळाडूंना अमेरिकेचा विसा वेळेत मिळाला नसल्यामुळे या दोन सामन्यांविषयी संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता खेळाडूंना विसा मिळाला असून सर्वजन अमेरिकेत दाखल झाले आहेत. वेस्ट इंडीज क्रिकेटने याविषयी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत (ndia vs West Indies T20 Series 2022) भारतीय संघ सध्या १-२ अशा घाडीवर आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने खेळायचे बाकी आहेत, जे अमेरिकेच्या प्लोरिडा शहरात पार पडतील. मालिकेतील हे शेवटचे दोन सामने ६ आणि ७ ऑगस्ट (रविवार आणि सोमवार) रोजी खेळले जातील. दोन्ही सामने ठरेलल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेवर खेळले जातील.
तत्पूर्वी उभय संघातील तिसरा सामना खेळला गेल्यानंतर मालिकेतील पुढचे दोन सामने खेळले जातीलच, याची कसलीही खात्री नव्हती. कारण खेळाडूंना अमेरिकेचा विसा मिळाला नव्हता. भारत आणि वेस्ट इंडीज संघातील अनेकांकडे अमेरिकेचा विसा आधीच होता, मात्र राहिलेल्या काही खेळाडूंकडे विसा नसल्यामुळे ही अडचण निर्णाय झाली होती. मात्र, खेळाडूं मंगळवारी (२ जुलै) तिसरा सामना खेळल्यानंतर विसा मिळवण्यासाठी गुआना शहरात गेले होते. त्याठिकाणी अमेरिकेच्या दुतावासात खास बैठक पार पडल्याचेही सांगितेल जात आहे.
The #MenInMaroon arrived in Florida during the early hours of this morning!
WI play India in the 4th and 5th T20I of the @goldmedalindia T20 Cup, presented by Kent Water Purifiers on Saturday and Sunday #WIvIND 🏏🌴 pic.twitter.com/56nyGHiBlt
— Windies Cricket (@windiescricket) August 3, 2022
विसाचा प्रश्न मार्गी लागण्यापूर्वी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने परिस्थिची सविस्तर माहिती दिली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, “अनेक खेळाडूंकडे अमेरिकेचा विसा आधीपासूनच होता. पण अनेकांना अजूनही त्याठिकाणचा विजा अद्याप विजा मिळाला नाहीये. आम्ही विदेश मंत्रालय आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डच्या संपर्कात आहोत. कारण वेस्ट इंडीज या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे आणि याच कारणास्तव ते नियोजनात बदल करू शकतात.”
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत टी-२० मालिका –
पहला सामना – भारतने ६८ धावांनी जिंकला
दुसरा सामना – वेस्ट इंडीज ५ विकेट्सने विजयी
तीसरा सामना – भारतने ७ विकेट्सने जिंकला
चौथा सामना – ६ ऑगस्त (फ्लोरिडा, अमेरिका)
पाचवा सामना – ७ ऑगस्त (फ्लोरिडा, अमेरिका)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी लकी! पठ्ठ्याने जेवढे सामने खेळले, तेवढेही सामने संघाने जिंकले
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
CWG 2022 | भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच, वेटलिफ्टिंगमध्ये गुरदीपने जिंकले दहावे पदक