भारताचा वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा संघ बीसीसीआयने आज (१४ जुलै) जाहीर केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच संघामध्ये आर अश्विनचे पुनरागमन झाले आहे. तो दुखापतींमुळे संघातून काही काळ बाहेर होता.
वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना संघातून वगळल्याने सगळे आश्चर्यचकित झाले आहे. त्यातच सध्या बुमराहचा फॉर्म पाहता त्याला संघातून वगळले का गेले याचे कारण स्पष्ट झाले आहे.
बुमराह सतत क्रिकेट खेळत असल्याने त्याला निवड अधिकाऱ्यांनी विश्रांती देण्याचे ठरवले आहे. कारण भारतीय संघाला पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये एशिया कप खेळायचा आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी त्याचा फिटनेस उत्तम असावा कदाचित यासाठीच त्याला या मालिकेत घेतले नाही.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत बुमराह बरोबरच रोहित, विराट, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांना बाहेर ठेवले. तर टी२० मालिकेसाठी हार्दिक आणि रिषभ पंत यांना पुन्हा संघात घेतले आहे.
बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देणे, कर्णधारांमध्ये बदल, तर काही वेळा भारताचे दोन संघ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यात, युवा खेळाडूंना संधी अशा काही बाबी सध्या दिसल्या आहेत. यासाठी भारतीय संघ निवड अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की आगामी टी२० विश्वचषकासाठी उत्कृष्ठ संघ बनवण्याची तयारी सुरू आहे.
बुमराह इंग्लंड दौऱ्यातील तिन्ही प्रकारच्या सामन्यांत चमकत आहे. त्याने एजबस्टन कसोटीमध्ये ५, एक टी२० सामन्यात २ आणि पहिल्याच वनडे सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत. केनिंग्टन, द ओव्हल येथे झालेल्या त्या वनडे सामन्यात त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ७.२ षटकात १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या मैदानावर ५ पेक्षा सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
ओव्हलवर केलेल्या कामगिरीमुळे बुमराह आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध तीन वेळा ५ किंवा ५ पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कसोटी आणि दोन वनडे सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर श्रीनाथ आणि भुवनेश्वर नंतर पहिल्या १० षटकात ४ विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या,रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनचं पुनरागमन, तर युवा बिश्नोईवरही जबाबदारी; विडिंजविरुद्ध भारताची फिरकी फळी आहे मजबूत!
IND vs WI: टीम इंडियात ‘या’ फिरकीपटूचे पुनरागमन, कारकीर्द वाचण्यासाठी करेल सर्वतोपरी प्रयत्न
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टिम इंडियाची घोषणा, विराटसह ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर