---Advertisement---

हुश्श! ईशानच्या हातातून निसटलेला चेंडू, पण स्वत:ला सावरत दुसऱ्या हाताने टिपला अफलातून झेल, Video

Ishan-Kishan
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यासाठी भारतीय संघात 2 नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. यामध्ये यशस्वी जयसवाल आणि ईशान किशान यांचा समावेश आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून 14 वनडे आणि 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यष्टीमागे चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, त्याला एक चूक महागात पडू शकली असती. ही घटना विंडीजच्या डावाच्या 32व्या षटकात पाहायला मिळाली.

ईशान किशनचा शानदार झेल
वेस्ट इंडिजच्या डावातील 32वे षटक टाकत असलेल्या रवींद्र जडेजा याने अखेरच्या चेंडूवर जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) याला बाद केले. झाले असे की, अखेरच्या चेंडूवर सिल्वा जडेजाचा चेंडू खेळण्यास चुकला आणि चेंडू बॅटची कड घेत ईशानच्या दिशेने उडाला. यावेळी ईशान लगेच सावध झाला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. यावेळी त्याने वेळ असतानाच स्वत:ला सावरले आणि दुसऱ्या हाताने शानदार झेल पकडत सिल्वाला तंबूच्या दिशेने मार्गस्थ केले. त्यामुळे सिल्वाला 13 चेंडूत फक्त 2 धावा करून तंबूचा रस्ता पकडावा लागला. लंचनंतर ही भारतासाठी पाचवी विकेट ठरली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यापूर्वी ईशानने रेमन रीफर याचाही झेल पकडत त्याला बाद केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आपल्या शानदार यष्टीरक्षणाने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुकही करत आहेत.

विंडीजने पार केला 100 धावांचा आकडा
सिल्वाची विकेट पडल्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 5 बाद 76 धावा होती. मात्र, विंडीज संघाने 100 धावांचा आकडा पार केला. 44 षटकांनंतर त्यांंनी 5 बाद 102 धावा केल्या. त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स गमावत 150 धावांवर डाव संपुष्टात आला. यावेळी वेस्ट इंडिजसाठी ऍलिक अथानाझे याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 99 चेंडूंचा सामना करताना 47 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) चमकला. त्याने 24.3 षटके गोलंदाजी करताना 6 निर्धाव षटके टाकत 60 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही कमालीची गोलंदाजी केली. त्याने 14 षटकात 7 षटके निर्धाव टाकत 26 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनाही प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. (wicket keeper ishan kishan took joshua da silva catch see video ind vs wi)

महत्वाच्या बातम्या-
केदार जाधवचं नशीब फळफळलं! ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी ताफ्यात झाला सामील
बापानंतर लेकाला आऊट करून अश्विनने घडवला इतिहास, बनला ‘असा’ पराक्रम करणारा पहिला-वहिला भारतीय गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---