---Advertisement---

पहिल्या चेंडूवर विकेट व विनींग धाव घेत ‘त्याने’ रचला इतिहास

On: गुरूवार, सप्टेंबर 17, 2020 11:57 AM
---Advertisement---

मँचेस्टर। बुधवारी(१६ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने जिंकून मालिकाही २-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यात ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऍलेक्स कॅरी(१०६) आणि ग्लेन मॅक्सवेल(१०८) यांनी ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी केली. त्यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या या विजयात मिशेल स्टार्कचाही महत्त्वाचा वाटा राहिला. त्याने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. तसेच ३ चेंडूत ११ धावा केल्या.

स्टार्कने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद केले होते. तर दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद केले होते. त्याचबरोबर नंतर ऑस्ट्रेलियाकडून धावांचा पाठलाग करताना त्याने आक्रमक खेळत ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजयी चौकार मारला होता.

त्यामुळे तो एकाच वनडे सामन्यात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा आणि त्याच सामन्यात विजयी धाव काढणारा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी डुगी ब्राऊन या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने डिसेंबर १९९७ ला वेस्ट इंडिजविरुद्ध शारजाह येथे खेळताना सर्वात आधी असा कारनामा केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---