प्रत्येक फ्रँचायझी संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी संघात महत्त्वाचे बदल करत आहेत. काही संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. तसेच, काहींनी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी इतर खेळाडूंनी ताफ्यात सामील केले आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या नावाचाही समावेश आहे. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत दुखापतीमुळे स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीये. अशात माध्यमांतील वृत्तांनुसार, पंतच्या जागी दिल्लीने यष्टीरक्षक फलंदाजाला ताफ्यात सामील केले आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल आहे. अभिषेक देशांतर्गत पातळीवर बंगाल क्रिकेटसाठी खेळतो.
अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याला जास्त अनुभव नाहीये. मात्र, त्याने त्याच्या सरावाने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला प्रभावित केले आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चाहत्यांसह संघालाही अभिषेक पोरेल रिषभ पंत (Abhishek Porel Rishabh Pant) याची उणीव भासू देणार नसल्याची आशा आहे.
Abhishek Porel set to replace Rishabh Pant in Delhi Capitals. (Source – PTI)
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2023
दिल्ली कॅपिटल्समध्ये अभिषेकची एन्ट्री
अभिषेक पोरेल याच्या कारकीर्दीबाबत बोलायचं झालं, तर त्याने खास कामगिरी केली नाहीये. त्याने फक्त 3 टी20 सामने खेळले आहेत. तसेच, त्यात त्याला फक्त 22 धावा करण्यात यश आले आहे. अशात म्हटले जाऊ शकते की, दिल्लीने अभिषेकला बदली खेळाडू म्हणून संघात घेऊन एक मोठा डाव खेळला आहे. आता तो संघासाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्णधारही बदलला
कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) अपघातामुळे गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला स्पर्धेत खेळता येणार नाहीये. अशात त्याच्या जागी संघाचा कर्णधार म्हणून डेविड वॉर्नर (David Warner) याची निवड करण्यात आली आहे. वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली 2016च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले होते.
यष्टीरक्षकावर मोठी जबाबदारी
आयपीएलबाबत बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स नेहमीच बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील दोन हंगामात या संघांनी खराब कामगिरी केली आहे. अशात हे संघही पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतील. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सलाही मजबूतीने उभे राहावे लागेल. दुसरीकडे, मागील हंगामात दिल्लीने ज्याप्रकारे प्रदर्शन केले, ते पाहून असे म्हटले जाऊ शकते की, दिल्ली दुसऱ्यांदाही ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत आहे. अशात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत अभिषेक पोरेलवर मोठी जबाबदारी आली आहे. (wicketkeeper batsman abhishek porel is going to play in place of rishabh pant in dc ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये रोहितला पछाडत विराटची गरुडझेप, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फिफ्टीनंतर मोठा फायदा
ICC Rankings : राशिद खान बनला टी20चा बादशाह, आयपीएलपूर्वीच ‘या’ गोलंदाजाला पछाडत पटकावले अव्वलस्थान