इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान स्पर्धेतील पहिलीच लढत आयपीएलच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएल ट्रॉफी पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये पार पडणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन जोरदार सराव करताना दिसून येत आहे. त्याचा सराव करतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
इशान किशन हा उत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे. परंतु या मोठ्या सामन्यापूर्वी हे खेळाडू आणखी जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक पार्थिव पटेल हा युवा इशान किशनला यष्टीरक्षणाचे धडे देत आहे. पार्थिव पटेलने गेली अनेक वर्ष भारतीय संघासाठी यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
इशान किशनच्या या सराव सत्रात प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यात आला असल्याचे दिसत आहे. यामध्ये यष्टीच्या मागे साधा सोपा झेल टिपण्यापासून ते वेगवान झेल टिपण्याचा देखील समावेश होता. हे सराव सत्र इतके कठीण दिसत आहे की, ते इशान किशनला जिमनॅस्टिक पेक्षाही कठीण वाटले. इशान किशन संपूर्ण सराव सत्र सुरू असताना तो पॉसिटीव्ह दिसून आला होता.(Wicketkeeper batsman Ishan kishan gets training from wicket keeping master Parthiv patel)
???? ????????????????????????-???????????????????????????? ???????????????????????????????????????????? ????
Watch @parthiv9 in training with his apprentice @ishankishan51! ????????#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @MXTakaTak MI TV pic.twitter.com/j6GTUpqTRV
— Mumbai Indians (@mipaltan) September 15, 2021
पार्थिव पटेल आपल्या अनुभवातून इशान किशनचे यष्टिरक्षण आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान इशान किशनने घेतलेली मेहनत पाहून पार्थिव पटेल देखील खुश झाला आहे.
क्रिकेट चाहते गेल्या काही महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती, ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा स्थगित करण्यात आली, त्यावेळी २९ सामने झाले होते. उर्वरित ३१ सामने हे दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आपल्या चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकल्याने चिडला पाकिस्तानी गोलंदाज, तिखट खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल
गोलंदाजाने चेंडूच इतका खतरनाक टाकला की, स्टंपने केला डिस्को डान्स!! फलंदाज ब्रावोही चकित
मुंबईविरुद्ध सर्वाधिक तळपलीय चेन्नईच्या ‘थाला’ अन् ‘चिन्ना थाला’ची बॅट, पाहा टॉप-५ मधील इतर नावे






