नुकताच टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेला इंग्लंडच्या रूपात विजेता मिळाला. ही स्पर्धा संपल्यानंतर आता इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएलचा छोटा लिलाव (मिनी ऑक्शन) 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. गतविजेता गुजरात टायटन्स संघ आपल्या ताफ्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याला रिटेन करणार असल्याचे वृत्त आहे.
टी20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासाठी हिरो ठरलेला मॅथ्यू वेड याला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या मेगा लिलावात 2.40 कोटींना ताफ्यात सामील केले होते. विशेष म्हणजे, वेड याने पहिल्यांदा आयपीएल 2011मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तो दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला होता. त्या स्पर्धेत त्याने 3 सामने खेळले होते. त्यानंतर त्याला 2022च्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स संघाने घेतले. या स्पर्धेत त्याने 10 सामने खेळताना 113.77च्या स्ट्राईक रेटने 157 धावा चोपल्या होत्या.
दरम्यान, वेडचा ऑस्ट्रेलियन सहकारी आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज ऍरॉन फिंच हा या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) गुजरात टायटन्स संघाचे खेळाडू लॉकी फर्ग्युसन आणि रहमनुल्लाह गुरबाज हे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या ताफ्यात सामील झाले. मागच्या शुक्रवारी (दि. 11 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेन्डॉर्फ याला मुंबई इंडियन्स संघासोबत ट्रेड केले होते. तसेच, सॅम बिलिंग्स याने आयपीएल 2023मधून आपले नाव काढून घेतले. तो, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. स्पर्धेतून बाहेर पडण्याचे कारण देत त्याने म्हटले की, त्याचे लक्ष आता कसोटी क्रिकेटवर आहे.
मागील लिलावात शिल्लक राहिलेल्या पर्स आणि मुक्त केलेल्या खेळाडूंच्या मूल्याव्यतिरिक्त, संघांना आगामी लिलावात खर्च करण्यासाठी अतिरिक्त 5 कोटी रुपये असतील. यामुळे त्यांच्याकडील एकूण पर्सची रक्कम ही 95 कोटी रुपये होईल. (Wicketkeeper Batsman Matthew Wade set to be retained by Gujarat Titans ahead of IPL auction on December 23)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 पूर्वी दिल्लीने खेळला मोठा डाव, ‘या’ मॅचविनर खेळाडूला धाडले कोलकाताच्या गोटात
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित