भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या स्पर्धेत युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजूनही संधी दिली गेली नाहीये. भारताच्या ताफ्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक याला सामील केले गेले आहे. अशात पंत सध्या संघसहकाऱ्यांना पाणी पाजायचे काम करत आहे. अशातच त्याचा यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) याने चाहत्यांचा दिवस खास बनवला. पर्थच्या मैदानावर सरावानंतर पंत काही चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसला. तसेच, त्याने यावेळी काही चाहत्यांसोबत सेल्फीही काढला. चाहत्यांसोबत वेळ घालवून झाल्यानंतर निघत असतानाच एका चाहत्याने म्हटले की, “भावा, तू ओपनिंग कर भारताचे नशीब बदलून जाईल.” रिषभ पंतनेही मागे वळत त्या चाहत्याला पाहिले. मात्र, यावेळी तो काहीही न बोलता पुन्हा पुढे निघून गेला.
https://twitter.com/waltairblues/status/1586327729053368320?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1586327729053368320%7Ctwgr%5Eaafa167975983d5a99a6c01f0d4b22cc92fabf82%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Frishabh-pant-viral-video-fan-urges-him-to-open-109546
खरं तर, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने आतापर्यंत टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत खास कामगिरी केली नाहीये. तो बॅट आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही गोष्टींमध्ये फ्लॉप ठरत आहे. जर रोहित शर्मा पुढील सामन्यापूर्वी पंतला संघात सामील केले, तर कदाचित याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.
भारतीय संघाचे 3 सामने
भारतीय संघाने या विश्वचषकात तीन सामने खेळले. यातील पहिल्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्सविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या वाट्याला पराभव आला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभूत केले. भारताला पुढील सामने बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध खेळायचे आहेत. भारताने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला, तर ते सहजरीत्या उपांत्य सामन्यात प्रवेश करतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकची दुखापत गंभीर! बांगलादेशविरुद्ध पंत होणार प्लेईंग इलेव्हनमध्ये ‘इन’
दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव हा शुभसंकेत! आता टीम इंडिया जिंकणार वर्ल्डकप?