---Advertisement---

दुर्दैव! पदार्पणाची संधी असतानाही कोलंबो वनडेला मुकला सॅमसन, आता संपूर्ण दौऱ्यातूनही बाहेर?

On: सोमवार, जुलै 19, 2021 12:03 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना रविवारी (१८ जुलै) पार पडला. या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. परंतु मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील विस्फोटक फलंदाजाला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही फलंदाजांना संधी देण्यात आली होती. परंतु असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, या सामन्यात विस्फोटक फलंदाज संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हेनमध्ये खेळवले जाईल.

परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो पहिल्या वनडे सामन्याला मुकला आहे. बीसीसीआयने याबद्दल स्पष्टीकरण देत सांगितले होते की, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला संघात संधी दिली गेली नाही. मेडिकल टीम सध्या त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

आता यानंतर अशी बातमी येत आहे की, त्याला दुखापतीमुळे संपूर्ण श्रीलंका दौऱ्यातून बाहेर व्हावे लागू शकते. त्याची दुखापत गंभीर असल्याकारणाने तो एकाही सामन्यात खेळू शकणार नाही. यामुळे तो संपूर्ण दौऱ्याला मुकू शकतो. परंतु अद्याप यासंबंधी कसलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. (Wicketkeeper Batsman sanju Samson ruled out of srilanka series due to injury)

 

संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला त्याच्या वाढदिवसाच्या (१८ जुलै) दिवशी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. तसेच पुढे ४२ चेंडुंमध्ये ५९ धावांची तुफानी खेळी केली. तत्पुर्वी मार्च २०२१ मध्ये त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात देखील त्याने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’

आई शप्पथ! इंग्लंडच्या ‘या’ शतकवीराने ठोकला १२२ मीटरचा गगनचुंबी षटकार, सर्वत्र रंगली एकच चर्चा

‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---