रविवारी (२ मे) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. तसेच या सामन्यातील पहिल्या डावात पृथ्वी शॉने असे काही कृत्य केले होते, ज्यामुळे कर्णधार रिषभ पंतही घाबरला होता.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून मयंक अगरवालने नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. केएल राहुल दुखापतग्रस्त असल्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी मयंक अगरवालला देण्यात आली होती.
पंजाबच्या डावातील दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉइनिस गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर मयंक अगरवालने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट खेळला होता. त्या शॉटचा चेंडू सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पृथ्वी शॉच्या हातात गेला होता. या शॉटवर मयंक अगरवालने पहिली धाव पूर्ण करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. परंतु पृथ्वी शॉने चेंडू पकडत कसलाही विलंब न करता यष्टीरक्षक रिषभ पंतच्या दिशेने फेकला होता. त्यामुळे मयंक अगरवालने दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला होता.
मात्र पृथ्वी शॉने तो चेंडू इतक्या वेगाने फेकला होता की, यष्टीरक्षण करत असलेला रिषभ पंत देखील घाबरून गेला होता. तो चेंडू रिषभ पंतच्या डोक्याच्या वरून निघून गेला. रिषभ पंत स्वत:चा बचाव करत डोक्याला हात लावून मैदानावर बसला होता. हे पाहून पृथ्वी शॉला देखील हसू आवरले नव्हते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1388875942370582540?s=20
या सामन्यात मयंक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार मयंक अगरवालने सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने ३९ धावांचे योगदान दिले होते. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने १४ चेंडू शिल्लक असताना, ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
“नक्कीच सनरायझर्समध्ये कसली तरी डाळ शिजतेय,” वॉर्नरला संघाबाहेर केल्याने दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘तुझे हाल बघवेना’, संघनायकाचा बनला वॉटरबॉय; डेविड वॉर्नरची अवस्था बघून चाहते हळहळले
पंतची विकेट पंतच घेऊ शकतो! मोठा शॉट खेळण्याच्या नादात रिषभच्या हातून सुटली बॅट अन्…