भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये आहेत. विराट हा भारतीय संघासोबत इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला आहे. त्यामुळे अनुष्का देखील विराटसोबत इंग्लंडमध्ये आहे. मागील काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने मुलगी वामिका सहा महिन्यांची झाली असल्याने लंडनमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यानचे फोटो अनुष्काने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले होते.
आता विराट आणि अनुष्काची जोडी इंग्लंडमध्ये फिरताना दिसून येत आहेत. यादरम्यानचे काही फोटो अनुष्काने पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी शहरात आरामात फिरत होते. मी हवेमध्ये उडणारे माझे केस नीट करत होते. एका चाहत्याने माझ्याकडे पाहिले आणि माझा फोटो क्लिक करू देण्यास भाग पाडले. माझा फोटो काढल्यानंतर तो चाहता आनंदी दिसत होता. माझ्या चाहत्यांसाठी काहीही!’
परंतु हे सर्व फोटो पाहिल्यानंतर असे दिसून येते की, तो चाहता दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. अनुष्काने नंतर ही गोष्ट सांगितली की तिचे फोटो दुसराच कोणतातरी चाहता काढत होता.
विराटसोबत अनुष्का मस्ती-मजाक करत असतानाचे फोटो पाहून चाहतेही प्रेम व्यक्त करत आहेत. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघेही हसत असलेले दिसून येत आहेत. ऑलिव्ह ग्रीन कार्डिगन आणि निळ्या जीन्समध्ये अनुष्का मस्त दिसत आहे. तर विराटने पांढरी पँट आणि काळा स्वेटशर्ट घातला आहे.
https://www.instagram.com/p/CRa7XNvpc0U/?utm_source=ig_web_button_share_sheet
काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने वामिका सहा महिन्याची झाल्यामुळे तिचा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यानचे काही फोटो अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो पोस्ट करत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘एक हसू जे आमचे संपूर्ण दुनिया बदलू शकते. मला आशा आहे की आम्ही दोघेही तुझ्यावरील प्रेम सिद्ध करू शकू, ज्याची तूला (वामिकाला) आमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या तिघांना 6 महिन्याच्या शुभेच्छा.’
जर अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने यावर्षी एप्रिलमध्ये पुन्हा शुटिंग सुरू केले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार अनुष्का नवदीप सिंग दिग्दर्शित क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनुष्काचा शेवटचा चित्रपट शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबतचा होता. तो चित्रपट 2018 मधील ‘झिरो’ हा हिंदी चित्रपट होता.
महत्त्वाच्या बातम्या-
SLvIND: माजी क्रिकेटरची मागणी; ३४ सामन्यात ११८ विकेट्स घेणाऱ्या ‘त्या’ जोडीला एकत्र खेळवा
भलाईचा जमानाच नाही! खिलाडूवृत्ती दाखवत रूटने ज्याला जिवनदान दिले, त्यानेच संघाला दिला चोप
त्याच्यात सेहवागची छबी दिसते; जबरदस्त फॉर्मात असलेल्या ‘या’ भारतीय शिलेदाराची विरोधी संघातून स्तुती




