ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केसे आहे. तसेच विराट येत्या काही वर्षात अनेक विक्रम मोडेल असा विश्वासही स्मिथने व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासून विराट आणि स्मिथ यांच्यात नेहमी तुलना होत असते.
‘विराट शानदार खेळाडू आहे. त्याची आकडेवारीच सर्वकाही सांगते. मला वाटते तो क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातील अविश्वसनीय खेळाडू आहे. मला असेही वाटते की आपण त्याला अनेक विक्रम मोडताना पाहू. त्याने आधीच अनेक विक्रम मोडले आहेतच आणि मला वाटते पुढील काही वर्षात तो आणखी विक्रम मोडेल. त्याच्याकडे धावांची भूक आहे आणि तो धावा जमवल्याशिवाय थांबत नाही. आशा आहे की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करणे थांबवेल,’ असे स्मिथ टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
‘कर्णधार म्हणून त्याने भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा संघ बनवले आहे. मी जसे पाहत आहे त्यावरुन तरी त्याने त्यांच्यासाठी उच्च मापदंड निश्चित केले आहेत. तो फिटनेस आणि आरोग्यासंबंधी जागरुक आहे. त्याने भारतीय संघाला एका चांगल्या स्थितीत ठेवले आहे. तो त्यांचे खूप चांगले नेतृत्व करतो,’ असेही स्मिथ विराटच्या नेतृत्वाबद्दल पुढे म्हणाला.
याबरोबर स्मिथने भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचेही कौतुक केले आहे.
…तर टीम इंडिया वाढवणार न्यूझीलंडचे टेन्शन, या दिग्गजाने व्यक्त केले मत
वाचा- 👉https://t.co/BJMqU2Wspd👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
गोलंदाजाला धडकून थेट हवेत उडून खाली पडला हा फलंदाज, पहा व्हिडिओ
वाचा- 👉https://t.co/J3jJnH4mqd👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020