इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे केवळ १ आठवड्याचा कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांची तयारी होत आली आहे. दरम्यान, अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय दिसले आहेत. यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा क्रिकेटपटू खलील अहमदही आहे. त्याने नुकतेच ट्विटरवर एका चाहत्याच्या प्रश्नाला खास अंदाजात उत्तर देत अनेक भारतीयांची मने जिंकली आहेत.
खलीलने ट्विटरवर प्रश्न-उत्तर सत्र सुरु केले होते. त्याला या सत्रादरम्यान चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यातील राशिद गुज्जर या नावाच्या एका चाहत्याने त्याला विचारले की ‘भाई तुला पाकिस्तानविरुद्ध खेळायला अवडेल का?’
Bhai Aap Pakistan K khilaf khelna psnd kro gy
— Rashid Gujjar 😎 (@RashidGujjar01) April 1, 2021
या चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना खलीलने लिहिले की ‘भारताची जर्सी घातल्यानंतर कोणताही संघ असू दे, त्याने काही फरक पडत नाही. ‘ खलीलचे हे उत्तर अनेक चाहत्यांना भावले असून त्याला चाहत्यांकडून मोठी पसंतीही मिळत आहे.
India ki jersey phnne k baad koe bhi team Aane do 🇮🇳 doesn’t matter
— Khaleel Ahmed 🇮🇳 (@imK_Ahmed13) April 1, 2021
खलील सध्या आयपीएल २०२१ हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्याने आत्तापर्यंत १७ आयपीएल सामने खेळले असून २१ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तो भारताकडून ११ वनडे आणि १४ टी२० सामने खेळला आहे. त्याने ११ वनडेत १५ विकेट्स आणि १४ टी२० सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.
राशिद खानची मजेशीर प्रतिक्रिया
खलीलच्या या ट्विटरवरील प्रश्न-उत्तर सत्रात त्याचा सनरायझर्स हैदराबाद संघातील संघसहकारी राशिद खाननेही एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट केले की ‘कोणताही प्रश्न नाही सर, मी तुमचा मोठा फॅन आहे.’
No question Sir Big fan 😂😂
— Rashid Khan (@rashidkhan_19) April 1, 2021
राशिदच्या या ट्विटवर खलीलनेही गमतीशीर प्रतिउत्तर दिले आहे. खलील म्हणाला, ‘तू माझा एसी आहेस, फॅन नाही.’
You are my AC not fan ❤️❤️
— Khaleel Ahmed 🇮🇳 (@imK_Ahmed13) April 1, 2021
सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना केकेआरशी
सनरायझर्स हैदराबादचे जवळपास सर्व खेळाडू चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. हैदरबाद संघाला त्यांचे साखळी फेरीतील पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहेत. त्यांचा पहिला सामना ११ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कधीकाळी हॉकी खेळणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये केकेआरकडून पदार्पणासाठी सज्ज
आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम इकॉनॉमी रेट असलेले अव्वल ५ गोलंदाज, केवळ एक आहे भारतीय
‘ही तुमची शेवटची वेळ,’ लाईव्ह सामन्यात कोहलीने दिली होती इंग्लिश खेळाडूला धमकी; आता झाला खुलासा