भारत उद्या बुधवारी श्रीलंकेविरुद्ध या मालीकेतला दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या मैदानावर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत बढत मिळवली आहे, आता उद्याचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
श्रीलंकेचा संघ हा भारताच्या संघापुढे खूपच नवखा दिसत आहे. सामने बघताना असे वाटत आहे की एका कुस्तीच्या सामन्यात दोन वेगळ्या वजनी गटातील कुस्तीपटू खेळत आहेत. त्यात श्रीलंकेला संकटांनी चारही बाजूनी घेरले आहे असे दिसून येत आहे. श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिनेश चंडिमल पहिल्या सामन्याला निमोनियामुळे मुकला तर आता त्याचा जो स्टॅन्ड इन कर्णधार आहे म्हणजे रंगणा हेराथही आता आजारी आहे आणि तो सामना खेळणार का नाही या वर शंका आहे.
दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर भारताकडे सलामीला कोण येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. के एल राहुल जो की पहिला सामना खांद्यच्या दुखापतीमुळे मुकला तो संघात परत आला आहे आणि आता मागील सामन्यात चांगला खेळ करण्याऱ्या अभिनव मुकुंदला संघात संधी मिळणार का राहुल संघात कम बॅक करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मागील ५ सामन्यातील कामगिरी:
श्रीलंका
हार, विजय, हार, विजय, हार.
भारत
विजय, विजय, अनिर्णित, विजय, हार.
स्पॉटलाइट मधील खेळाडू:
भारत
के एल राहुल
दुखापत होऊन बाहेर जाण्याच्या आधीच्या ७ डावात त्याने ६ अर्धशतके केली आहेत. त्यात बंगलोर मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९० धावांची खेळी ही आहे. राहुलने त्याची क्षमता वेळोवेळी दाखवली आहे त्यामुळेच त्याला डायरेक्ट ११ मध्ये एन्ट्री मिळू शकते.
श्रीलंका
दिनेश चंडिमल
श्रीलंकेचा कर्णधार जो की आजारातून बाहेर येत आहे, तो पहिल्या सामान्यपासूनच चांगली खेळी करेल अशी श्रीलंकेला अपेक्षा असेल. मागील सामन्यात भारताने श्रीलंकेच्या फलंदाजीचा मधल्या फळीचा धुव्वा उडवला होता. आता चंडिमल आल्या नंतर श्रीलंकेच्या फलंदाजीला समतोल मिळेल असे वाटते आहे.
संभाव्य संघ:
श्रीलंका : उपुल थरंगा, दमुथा करूरतने, कुशल मेंडिस, दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्युज, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), धनंजय डिसिल्वा, दिलरुवंन परेरा, मलिंदा पुष्पाकुमार, रंगना हेराथ, नुवान प्रदीप.
भारत: के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्र अश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी.
खेळपट्टीचा अनुमान:
खेळपट्टीवर वाळलेले गवत आहे, पण ही खेळपट्टी गॉलच्या खेळपट्टी पेक्षा सपाट ज्यामुळे फलंदाजीसाठी मदत होऊ शकते. साधारणत: या मैदानावर चेंडू तिसऱ्या दिसवसापासून वळण्यास सुरुवात होईल. थोडाफार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.