---Advertisement---

चांगला खेळला नाही म्हणून कर्णधारालाच दिला संघातून डच्चू

On: मंगळवार, फेब्रुवारी 5, 2019 8:50 PM
---Advertisement---

श्रीलंका संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा खूपच निराशाजनक ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन्ही कसोटी सामने गमावले आहेत.

या वाईट कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डने कसोटी संघाचा कर्णधार दिनेश चंडिमलला कर्णधारपदावरून काढले आहे. त्याच्या ऐवजी दिमुथ करुणारत्ने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे.

चंडिमलला कामगिरी सुधारण्यासाठी श्रीलंका क्रिकेटने देशांतर्गत सामने खेळण्यासाठी परत बोलावले आहे. त्याने  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावांमध्ये 5, 0,15 आणि 4 अशा धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी श्रीलंका संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रथम श्रेणी सामन्यात दोन्ही डावात द्विशतके करणारा अँजेलो परेराला अंतिम 17 जणांच्या संघात स्थान दिले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ-

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), निरोशान डिकवेला, लाहिरू थिरीमाने (उपकर्णधार), कुशल मेंडीस, कुशल परेरा, धनंजया डीसिल्वा, ओशाडा फर्नांडो, अँजेलो परेरा, सुरंगा लकमल, कसुन रजिता, विश्वा फर्नांडो, चमिका करूणारत्ने, मोहमद शिराज, लक्क्षण संदकन, लसिथ एमबुलदेनिया

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी

विश्वचषकाआधी गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला बसणार मोठा झटका…

धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment