---Advertisement---

इटलीविरुद्ध विल जॅक्सची तुफानी खेळी! ‘सामनावीर’ ठरत मोर्गनचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

On: सोमवार, फेब्रुवारी 16, 2026 9:13 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील 29 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर इंग्लंड आणि इटली (England vs Italy) यांच्यात खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने इटलीवर 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच इंग्लंडचा संघ ‘सुपर-8’ फेरीसाठी पात्र ठरला आहे. इंग्लंडच्या या विजयात अष्टपैलू विल जॅक्स हिरो ठरला, ज्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने (Harry Brook) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. एकेकाळी संघ 150 धावा तरी करेल का, अशी शंका वाटत होती. अशा वेळी
7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने (Will jacks) अवघ्या 22 चेंडूत 53 धावांची झंझावाती खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार ठोकले. जॅक्सने अवघ्या 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने इयोन मॉर्गन (25 चेंडू, 2012) आणि जोस बटलर (25 चेंडू, 2021) यांचा विक्रम मोडीत काढला.

विल जॅक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला. फलंदाजीनंतर जॅक्सने गोलंदाजीतही 1 विकेट घेतली, मात्र तो थोडा महागडा ठरला (2 षटकांत 34 धावा). विजयासाठी 203 धावांचा पाठलाग करताना इटलीचा संघ झुंजार खेळ करूनही 178 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे इंग्लंडने दिमाखात सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---