आज (20 मे) रोजी चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर आयपीएल 2024 चा फायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरचा संघ कोलकाता नाईट रायडर्स समोर सनरायझर्स हैदराबादचं मोठं आव्हान असणार आहे. दोन्ही संघ चॅम्पियन बनण्यासाठी खूप आक्रमक अंदाजात मैदानावर उतरणार आहेत. केकेआर संघ तिसऱ्या ट्राॅफीसाठी मैदानावर उतरेल. केकेआरनं पहिलं विजेतेपद 2012 ला गौतम गंभीर कर्णधार असताना मिळवलं होतं. तर हैदराबादनं डेविड वाॅर्नर कर्णधार असताना 2016 ला विजेतेपद मिळवलं होतं.
आयपीएल 2012 ला मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. मात्र, आता गंभीर कोलकाता नाईट रायडर्सच्या मेन्टाॅरची भूमिका बजावत आहे. आयपीएल 2012 चा फायनल चेपॉक, चेन्नई येथे खेळला गेला. त्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स समोर 191 धावांचे लक्ष्य होतं. मात्र या संघानं मोठं लक्ष्य गाठलं. कोलकाता नाईट रायडर्स कडून मनविंदर बिसलानं 48 चेंडूत 89 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती.
कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होते. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सनं गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2014 जिंकलं. आयपीएल 2014 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं पंजाब किंग्जचा धुव्वा उडवला होता.. मात्र त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला यश मिळालं नाही. केकेआरच्या शेवटच्या विजेतेपदाला जवळपास 10 वर्षे उलटून गेली आहेत.
परंतु केकेआर 2021 ला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यात अपयशी ठरलं आहे. परंतु, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सेम टू सेम! श्रेयस अय्यरनं केली सुनील नारायणच्या गोलंदाजी स्टाईलची नक्कल, पाहा व्हायरल VIDEO
विजेतेपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव! ऑरेंज अन् पर्पल कॅप मिळवणारे खेळाडूही होतील मालामाल