इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अशात आता आयपीएल 2023 साठी त्यांच्याजागी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज मार्क बाउचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (16 सप्टेंबर) सोशल मीडियाद्वारे याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. मार्क बाउचर (Mark Boucher) हे मुंबईचे आतापर्यंतचे सातवे मुख्य प्रशिक्षक ठरले आहेत. विशेष म्हणजे आधीच्या काही प्रशिक्षकांनी मुंबईला पहिल्याच वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहेत. यामुळे बाउचरही ही मालिका अशीच सुरू ठेवणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पहिला हंगाम 2008मध्ये खेळला गेला. त्यावेळी मुंबईचे पहिले प्रशिक्षक लालचंद राजपूत होते. 2009च्या हंगामात शॉन पोलॉक आणि रॉबिन सिंग यांनी 2010 ते 2012पर्यंत मुंबईच्या आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची भुमिका पार पाडली आहे. या तिघांनतर जे तीन खेळाडू मुंबईला मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभले त्या तिघांनीही त्यांच्या पहिल्याच वर्षाच्या कार्यकाळात संघाला चॅम्पियन केले.
जॉन राईट हे 2013 आणि 2014च्या हंगामांमध्ये मुंबईचे मुख्य प्रशिक्षक होते. तर मुंबई 2013मध्ये पहिल्यांदाच आयपीएलचा चॅम्पियन ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याने 2015 आणि 2016च्या हंगामांमध्ये मुंबईचे मुख्य प्रशिक्षक सांभाळले. तर मुंबई 2015मध्येही दुसऱ्यांदा आयपीएलचा विजेता ठरला होता. त्याचबरोबर श्रीलंकेच्या जयवर्धने याने 2017पासून ते 2022पर्यंत आयपीएल मुंबईचे मुख्य प्रशिक्षक होते. त्याच्या कार्यकाळात मुंबईने आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद पटकावले आहेत. मुंबई 2017, 2019 आणि 2020 अशी तीन वेळा आयपीएलची चॅम्पियन ठरली.
यावरून राईट, पाँटिंग आणि जयवर्धने हे जेव्हा मुंबईचे मुख्य प्रशिक्षक बनले तेव्हा कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षात संघाला चॅम्पियन केले. ही मालिका 2023मध्ये सुरू राहणार की खंडीत होणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
Presenting आपले नवीन Head Coach – 𝐌𝐀𝐑𝐊 𝐁𝐎𝐔𝐂𝐇𝐄𝐑 💙
Paltan, drop a 🙌 to welcome the 🇿🇦 legend to our #OneFamily 👏#DilKholKe #MumbaiIndians @markb46 @OfficialCSA pic.twitter.com/S6zarGJmNM
— Mumbai Indians (@mipaltan) September 16, 2022
मुंबईने सर्वाधिक असे पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहेत. ही जेतेपद त्यांनी 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामांमध्ये जिंकली आहेत.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक:
लालचंद राजपूत – 2008
शॉन पोलॉक – 2009
रॉबिन सिंग – 2010 ते 2012
जॉन राइट – 2013 आणि 2014
रिकी पाँटिंग – 2015 आणि 2016
माहेला जयवर्धने – 2017 ते 2022
मार्क बाउचर – 2023*
महत्वाच्या बातम्या-