रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडला आहे. त्यानंतर लगेचच स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
मात्र त्यांचा कर्णधार सर्जियो रॅमोसने पुढचा म्हणजेच 2022चा कतार विश्वचषक वयाच्या 36व्या वर्षी पांढरी दाढी ठेवून खेळेल असे म्हटले आहे. सध्या रॅमोस 32 वर्षाचा आहे.
स्पेनला बाद फेरीत यजमान रशियाकडून पेनल्टी शूट-आऊटमध्ये 3-2 असे पराभवाला सामोरे जावे लागले.
” हा काही त्या खेळाचा शेवट नाही. गेरार्ड पिक आणि इनिएस्ता हे महत्त्वाचे खेळाडू आहेत पण यांनी निवृत्ती घेतली. मात्र बाकीचे खेळाडूही चांगलीच कामगिरी करत आहेत,” असे रॅमोस यावेळी म्हणाला.
स्पेनचे सध्याचे प्रशिक्षक फर्नांडो हिएर्रो हे युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (युइएफए) लीगमध्ये प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळणार नाही.
याबद्दल बोलताना रॅमोस म्हणाला, आम्हाला आमच्या प्रशिक्षकाचा अभिमान आहे. या स्थितीत त्यांनी योग्य ती साथ दिली. यासाठी मी त्यांचा आभारी आहे.
2010चा फिफा विश्वचषक स्पेनने जिंकला होता. त्यावेळेच्या संघात रॅमोस बरोबरच इनिएस्ता, पिक हे दोघेही होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: ब्राझिलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशा करताच केला खास पराक्रम
–पोर्तूगालचा संघ मायदेशी पोहचला, ख्रिस्तियाने रोनाल्डो मात्र गायब
–काय असे घडले ज्यामुळे ब्राझीलच्या विजयाचा हिरोला सोशल मीडियावर ठरला झिरो