ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात काही दिवसांपूर्वीच बॉर्डर- गावकसर ट्रॉफी कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाला जरी मालिकेत पराभव स्विकारावा लागला तरी त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांना या मालिकेदरम्यान विल पुकोवस्कीच्या रुपात एक चांगला फलंदाज मिळाला.
पुकोवस्कीने सिडनी कसोटीमध्ये भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ६२ धावांची खेळी जबरदस्त केली होती. तसेच पदार्पणाच्या सामन्यात जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाचा सामना करणे काही सोपे काम नाही. सामन्यानंतर जेव्हा विल पुकोवस्कीला विचारण्यात आले होते की बुमराह समोर खेळण्याचा अनुभव कसा होता. त्यावर त्याने आश्चर्यचकीत करणारे खुलासे केले होते. तो म्हणाला होता, मला व्हिडिओ गेममुळे जसप्रीत बुमराह याची गोलंदाजी खेळण्यास मला मदत झाली.
व्हिडिओ गेमने केली बुमराहची गोलंदाजी खेळण्यास मदत
ऑस्ट्रेलियन संघाचा युवा फलंदाज विल पुकोवस्की याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय संघाविरुद्ध केली होती. सिडनी क्रिकेट मैदानावर त्याने ६२ धावांची जबरदस्त खेळी केली होती. याचबरोबर जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांचा ही योग्यरितीने सामना केला होता.
तो म्हणाला,” जसप्रीत बुमराह याची गोलंदाजी करण्याची ऍक्शन वेगळीच आहे आणि याच कारणास्तव कसोटी क्रिकेटमध्ये त्याला खेळणे खूप कठीण आहे.” परंतु व्हिडिओ गेममुळे मला बुमराह याची गोलंदाजी खेळणे सोपे झाले.
शेन वॉटसन म्हणून खेळायचो ऍशेस प्लेस्टेशन गेम – विल पुकोवस्की
पुकोवस्की म्हणाला, “त्यावेळी मला शेन वॉटसन खूप आवडायचा, मी याआधी कधीच सिडनीमध्ये मोठा सामना खेळलो नव्हतो. परंतु, मी याआधी तिकडे प्ले स्टेशन गेम खेळलो आहे आणि याचमुळे मला त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी फायदा झाला.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये खेळताना रोहित शर्माच्या मानधनात कशी झाली वाढ? घ्या जाणून