---Advertisement---

IPL 2026: रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतील का? दुखापतीनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित

On: सोमवार, एप्रिल 13, 2026 8:06 PM
---Advertisement---

सध्या आयपीएल 2026 चा हंगाम जोरात सुरू असून भारतीय खेळाडू मैदानात आपली चमक दाखवत आहेत. हा हंगाम भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. समोर आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आयपीएलमधील खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहे. याच कामगिरीच्या जोरावर 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 20 संभाव्य खेळाडूंची निवड केली जाणार असल्याचे समजते.

या निवडीच्या प्रक्रियेत सर्वांचे लक्ष अनुभवी खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्यावर खिळले आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू 2027 चा विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. या हंगामात दोघांनीही आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली असून त्यांच्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले आहे. तिशी पार असूनही मैदानावरील त्यांचा चपळपणा तरुण खेळाडूंना टक्कर देणारा ठरत आहे.

मात्र, गेल्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आता ते किती लवकर पूर्णपणे फिट होऊन मैदानात पुनरागमन करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड करताना आयपीएलमधील त्यांचा फॉर्म आणि फिटनेस हेच दोन मुख्य निकष असणार आहेत, त्यामुळे रोहित आणि विराटसाठी पुढचे सामने अत्यंत महत्त्वाचे ठरतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---