आशिया चषकासाठी भारतीय संघात दोन यष्टीरक्षक फलंदाजांना समील गेले गेले. पहिला केएल राहुल आणि दोन म्हणजे ईशान किशन. मात्र, मंगळवारी (29 ऑगस्ट) मुख्य प्रशिक्षक यांनी सांगितल्याप्रमाणे केएल राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. अशात संजू सॅमसन याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सॅमसनला आशिया चषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संधी दिली गेली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी 21 ऑगस्ट रोजी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) साठी संघाची घोषणा केली. या संघात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनाही सामील केले गेले होते. असे असले तरी, राहुलच्या फिटनेसबाबत संका या दोघांकडून व्यक्त केली गेली होती. आता झाले देखील अगती तसेच. फिटनेसच्या कारणास्तव राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही. राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन (Ishan Kishan) यष्टीपाठी उभा राहण्याची पूर्ण शक्यता आहे. दुसरीकडे राहुल जर दोन सामन्यांनंतर देखील खेळू शकला नाही, तर संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नावावर संघ व्यवस्थापन विचार करू शकते.
तत्पूर्वी भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात ईशान किशन संघाचा भाग होता. मात्र, सॅमसनला या दौऱ्यात अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत त्याने एक अर्धशतक केले मात्र, इतर चारही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत पाहायला मिलाली. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यात देखील त्याला संधी दिली केली. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सॅमसनने 1* आणि 40 धावांची खेळी केली.
सॅमसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर भारतासाठी 13 वनडे सामन्यांमधील 12 डावांमध्ये 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी तितकी समाधानकारक नाहीये. त्याने 24 सामन्यांमध्ये 19.68च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. (Will Sanju Samson get a chance in Rahul’s absence, what will the team management decide in the Asia Cup?)
महत्वाच्या बातम्या –
याला म्हणतात क्रेझ! सरावानंतर ‘किंग’ कोहलीला दिसताच चाहत्यांनी केला ‘विराट-विराट’चा जयघोष, Video
भारताच्या सर्वात मोठ्या समस्येवर द्रविडने तोडले मौन; म्हणाला, ’18-20 महिन्यांपूर्वीही मी…’