---Advertisement---

संजू सॅमसन CSKमध्ये येणार का? चेन्नई व्यवस्थापनाची पहिली प्रतिक्रिया समोर!

On: मंगळवार, जुलै 1, 2025 7:26 PM
Sanju-Samson-And-MS-Dhoni
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनसाठी (Rajasthan royals captain Sanju Samson) आयपीएल 2025 (IPL 2025) हंगाम विशेष ठरला नाही. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सही आयपीएलच्या 18व्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही. त्यामुळेच हंगाम संपल्यानंतर, या दोन्ही संघांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. काही रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसन ट्रेडिंगच्या माध्यमातून चेन्नईचा भाग होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

या चर्चांवर आतापर्यंत चेन्नई फ्रँचायझीने किंवा संजू सॅमसनने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. पण आता प्रथमच चेन्नई व्यवस्थापनाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या माहितीनुसार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai super kings) सामील होऊ शकतो. त्याच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला रोख रक्कम आणि रविचंद्रन अश्विन (R Ashwin) मिळू शकतो, अशी चर्चा होत आहे. महत्त्वाचे म्हणजे अश्विन यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला आहे.

सध्या तरी दोन्ही फ्रँचायझींनी यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, क्रिकबझशी बोलताना चेन्नई व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने सांगितले, संजूच्या नावावर आम्ही नक्कीच विचार करत आहोत. तो एक भारतीय फलंदाज आहे, जो विकेटकीपर आणि ओपनर दोन्ही म्हणून खेळू शकतो. जर तो उपलब्ध असेल, तर त्याला घेण्याच्या पर्यायावर आम्ही नक्कीच विचार करू. त्याच्याबदल्यात कोणाला ट्रेड करायचं, यावर अजून निर्णय झालेला नाही कारण ही प्रक्रिया अजून पुढे गेलेली नाही.

आयपीएल 2025 दरम्यानच अशी माहिती समोर आली होती की, राजस्थान रॉयल्स आणि संजू सॅमसन यांच्यात काही गोष्टी सुरळीत नाहीत. त्यामुळे संजू सॅमसन संघ सोडण्याच्या विचारात आहे. या चर्चांना देखील उधान आले आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, फक्त चेन्नई नव्हे तर आणखी काही फ्रँचायझींनाही संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्याची इच्छा आहे. सध्या सर्वच संघ राजस्थान रॉयल्सकडे आपापले प्रस्ताव पोहोचवत आहेत, पण यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---