इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा टीम इंडियाची (Team india) निवड करण्यात आली तेव्हा त्यामध्ये सरफराज खानला संधी देण्यात आलेली नाही. न्युझीलँड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये निराशा जनक कामगिरीनंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला स्क्वाड मधून देखील बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला होता. इंडिया ए साठी शानदार प्रदर्शन केल्यानंतर आता भारतीय दिग्गज पुन्हा सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) संघातील अनुपस्थितीवर मोठे प्रश्न उपस्थित करत आहेत.
टीम इंडियातून (Team india) बाहेर झाल्यानंतर इंडिया ए साठी नर्वस नाईंटीज बनवले होते. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा करण्यात आली. यानंतर इंडिया ए साठी त्याने टीम इंडिया विरुद्ध शतक झळकावले होते. या शतकानंतर दिग्गज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सुद्धा सरफराज खान मुख्य संघात नसण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरफराजने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण इंग्लंड विरुद्धच केले होते, जिथे त्याने शानदार प्रदर्शन करत स्वतःला सिद्ध केले होते.





