---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर! स्टार खेळाडू बंगळुरूला रवाना

On: गुरूवार, डिसेंबर 25, 2025 5:27 PM
---Advertisement---

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सध्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना त्याच्या बरगडीला (Ribs) दुखापत झाली होती. मात्र, आता त्याच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

श्रेयस अय्यर आता दुखापतीतून सावरत आहे. 24 डिसेंबरला त्याने मुंबईत फलंदाजीचा सराव केला आणि विशेष म्हणजे फलंदाजी करताना त्याला कोणताही त्रास झाला नाही. तो आता बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये दाखल झाला आहे. तिथे तो पुढील 4 ते 6 दिवस वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. त्यानंतरच त्याच्या पुनरागमनाची नेमकी तारीख स्पष्ट होईल.

बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, श्रेयसने जिममध्ये नियमित सराव सुरू केला आहे. सध्या काळजीचे कोणतेही कारण नाही, पण त्याला संघात परत आणण्यासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही.

विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेद्वारे श्रेयस मैदानात परतण्यास उत्सुक आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे. जर श्रेयस फिट झाला, तर या मालिकेतून तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 3 ते 4 जानेवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे.

25 ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल घेताना श्रेयसच्या बरगडीला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला त्या सामन्यात फलंदाजीलाही येता आले नव्हते आणि थेट रुग्णालयात नेण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---