पुढील महिन्यापासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे. 1 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या ऍशेज मालिकेने ही टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होईल.
भारतीय संघ 22 ऑगस्टपासून विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेने टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात करणार आहे.
या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळाडू त्यांची नावे आणि क्रमांक असलेली पांढरी कसोटी जर्सी घालून खेळणार आहेत. त्यामुळे आता भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या 10 क्रमांकाच्या जर्सीचे आणि माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या 7 क्रमांकाच्या जर्सीचे काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सी बीसीसीआयने अनधिकृतरित्या निवृत्त केली आहे. याआधी सचिन निवृत्त झाल्यानंतर शार्दुल ठाकुरने 10 क्रमांकाची जर्सी घातली होती. पण त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
तसेच धोनीने डिसेंबर 2014मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे सध्या तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये वापरत असलेला 7 हा जर्सी क्रमांक कसोटीसाठी उपलब्ध आहे. पण त्याचा हा क्रमांक कसोटीमध्ये कोणताही भारतीय खेळाडू न वापरण्याची शक्यता आहे.
तसेच बहुतेक क्रिकेटपटू मर्यादीत षटकांसाठी वापरत असलेलेच जर्सी क्रमांक कसोटीसाठी वापरण्याची दाट शक्यता आहे.
याबद्दल एका बीसीसीआय अधिकारीने पीटीआयला सांगितले, ‘विराट 18 आणि रोहित 45 क्रमांक वापरेल, असे अपेक्षित आहे. बहुतेक खेळाडू त्यांचे वनडे आणि टी20 क्रिकेटमधील जर्सी क्रमांकच (कसोटीसाठी) वापरण्याची शक्यता आहे. एमएस धोनी कसोटी क्रिकेट खेळत नसल्याने 7 क्रमांक उपलब्ध आहे. पण कोणताही खेळाडू हा क्रमांक वापरण्याची शक्यता कमी आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘लोक 7 क्रमांकाच्या जर्सीचा संबंध थेट धोनीशी लावतात. वनडे मालिकेनंतरच कॅरेबियन बेटांवर(वेस्ट इंडीज) क्रमांक असलेली जर्सी पोहचेल.’
भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ पहिल्यांदा 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका खेळल. त्यांनतर 8 ते 14 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. या मालिकांनतर कसोटी मालिका सुरु होणार आहे. या संपूर्ण दौऱ्यासाठी एमएस धोनी अनुपलब्ध आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–क्षेत्ररक्षणाचा बादशहा होणार टीम इंडियाचा कोच?
–प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!
–भारतीय खेळाडूनंतर इंग्लंडसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळणारा तो ठरला दुसराच खेळाडू