आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील प्लेऑफ (playoff) मधील एलिमिनेटर सामना चंदिगडच्या मुल्लांपूर खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. एका बाजूला पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स (mumbai indians) असेल, तर दुसरीकडे गुजरात टायटन्स (Gujrat Titans). शुबमन गिलच्या (Shubham gill) नेतृत्वातील गुजरात या हंगामात शानदार पद्धतीने खेळली आहे. अंतिम काही सामने सोडल्यास, संघाने प्रत्येक विभागामध्ये जबरदस्त प्रदर्शन केल आहे. दुसरीकडे अनुभवी खेळाडूंनी भरलेली हार्दिक पांड्याची (hardik pandya’s mumbai indians) मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात जोरदार पुनरागमन केले आहे. सूर्यकुमार (Suryakumar yadav) तर गोलंदाजीमध्ये बुमराह-बोल्टच्या (bumrah-boult) जोडीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (Mi vs GT) संघात एलिमिनेटर सामना, मुलांपूरच्या यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेनियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाजांना धावा करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. या हंगामात फक्त एकदाच या मैदानावर 200 धावांचा आकडा पार झाला आहे. पंजाबने मुल्लांपूर मैदानावर 111 धावांचा बचाव करताना इतिहास रचला. म्हणजेच मुंबई आणि गुजरातमध्ये होणाऱ्या सामन्यात सुद्धा तुम्हाला चौकार षटकारांच्या पावसापेक्षा गोलंदाजांचा खेळ पाहायला मिळेल.
आयपीएल 2025 स्पर्धेत मूल्लांपूर स्टेडियमने आत्तापर्यंत 9 सामन्यांचे यजमान पद भूषवले आहे. त्यामध्ये 5 विजय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने प्राप्त केले आहेत, तर 4 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. पंजाब किंग्सने याच वर्षी चेन्नई विरुद्ध 6 खेळाडू गमावून 219 धावा केल्या होत्या, जी ह्या मैदानातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.






