---Advertisement---

IND vs AUS; केएल राहुलवर कारवाई करणार आयसीसी? नेमकं प्रकरण काय?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024 8:15 PM
---Advertisement---

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) पहिला सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात पर्थमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) 26 धावा करून बाद झाला. तिसऱ्या पंचाने त्याला बाद दिल्याने वाद निर्माण झाला होता. राहुलला विकेटच्या मागे झेलबाद घोषित करण्यात आले. तिसऱ्या पंचाच्या या निर्णयानंतर राहुल निराश होऊन तंबूत परतला.

केएल राहुलला (KL Rahul) विकेटच्या मागे झेलबाद देण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. मैदानावरील पंचांचा ‘नॉट आऊट’चा निर्णय बदलण्याच्या तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरही दोन्ही देशांच्या माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले. वास्तविक, मैदानावरील पंच रिचर्ड केटलबरो यांनी राहुलच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु यजमान संघाने डीआरएस घेतला. थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ‘स्प्लिट स्क्रीन व्ह्यू’ न पाहता निर्णय बदलला. हे सर्व लंचच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी घडले आणि भारताने 51 धावांत 4 विकेट्स गमावल्या. राहुलने 74 चेंडूत 26 धावा केल्या.

तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर, केएल राहुलनेही (KL Rahul) सूचित केले की, जेव्हा चेंडू काठावरून गेला तेव्हा त्याची बॅट पॅडला लागली होती. मात्र, तो काहीच करू शकला नाही. निराशेने डोके हलवत काहीतरी म्हणत तो मैदानातून निघून गेला. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याप्रकरणी राहुल दोषी आढळल्यास आयसीसी त्याच्यावर काही कारवाई करणार का?

खेळाडूंच्या वर्तनाच्या नियम 42.2 नुसार, जर लेव्हल 1 चा गुन्हा त्या संघाने कोणत्याही स्तरावर केलेला पहिला गुन्हा असेल, तर पंच पहिली आणि शेवटची चेतावणी देईल, जी संघाच्या सर्व सदस्यांना लागू होईल. तसेच, कोणत्याही स्तरावर त्या संघाने केलेल्या गुन्ह्यानंतर लेव्हल 1 चा गुन्हा घडल्यास, पंच विरोधी संघाला 5 पेनल्टी धावा देतात.

फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करणारे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “तिसऱ्या पंचाकडे पुरेसे पुरावे आहेत का, अशी माझी सुरुवातीची प्रतिक्रिया होती, ज्यामुळे त्यांनी मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला. मैदानावरील पंचांनी त्याला नॉट आऊट दिले होते. हा निर्णय बदलण्यासाठी पुरेशी कारणे होती असे मला वाटत नाही.”

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी (Michael Hussey) म्हणाला, “हे वादग्रस्त आहे. स्निकोमीटरवर स्पाइक होता, पण बॅटने चेंडू आदळल्यामुळे की बॅट पॅडला आदळल्यामुळे हे कळले नाही. बॅट पॅडवर आपटत असल्याचे तुम्ही पाहू शकता. याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हा निर्णय 100% न्याय ठरू शकत नाही. निराशाजनक बाब म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी तंत्रज्ञान आहे.” मॅथ्यू हेडन, वसीम जाफर आणि माजी पंच सायमन टॉपफेल यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS; “लवकर बाद कर लंडनला…” विराट बाद झाल्यानंतर चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल!
आता या चॅनलवर पाहा आगामी आशिया कपचे सामने, तब्बल इतक्या कोटींचा करार!
भारतीय फलंदाज कसोटीत सातत्यानं फ्लॉप का होत आहेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---