---Advertisement---

Team India: टीम इंडियाचा वनडे कर्णधार बदलणार? मोठी अपडेट समोर

On: मंगळवार, ऑगस्ट 5, 2025 10:01 PM
---Advertisement---

Current ODI captain Rohit Sharma: रोहित शर्मा सध्या भारतीय वनडे संघाचा कर्णधार आहे. त्याने कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, रिपोर्ट्सनुसार, भारतीय वनडे संघाचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे. जर रोहित शर्माने वनडे संघाची कर्णधारपद सोडले, तर त्याच्या जागी 3 खेळाडू कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतात. (Rohit Sharma ODI Captaincy)

या यादीत पहिले नाव शुबमन गिलचे आहे, त्याला नुकतेच कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे आणि त्याने शानदार कामगिरीही केली आहे. गिलने वनडेमध्ये 8 शतकांसह एकूण 2,775 धावा केल्या आहेत. (Shubman Gill Captain)

याशिवाय, श्रेयस अय्यरलाही भारतीय संघाचा नवा वनडे कर्णधार बनवले जाऊ शकते. (Shreyas Iyer Captain) त्याने वनडेमध्ये भारतासाठी उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. तसेच, हार्दिक पांड्या देखील वनडे संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो. (Hardik Pandya Captain)

रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत 273 वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान रोहितने 265 डावात फलंदाजी करताना 48.76च्या सरासरीने 11,168 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 58 अर्धशतकांसह 32 शतके झळकावली आहेत. वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 आहे. (Rohit Sharma ODI Stats)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---