---Advertisement---

IND vs ENG: मॅंचेस्टर कसोटी सामन्यात स्लेजिंग होणार? इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सच्या विधानामुळे खळबळ

On: मंगळवार, जुलै 22, 2025 8:24 PM
---Advertisement---

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stocks) मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी भारताला एक स्पष्ट संदेश दिला आहे. त्याने सांगितले की, इंग्लंडची टीम मैदानावर आक्रमकपणापासून मागे हटणार नाही.
स्टोक्सने स्पष्ट केलं की, इंग्लंड मुद्दामहून स्लेजिंग करणार नाही, पण जर सामनेदार आक्रमक झाला, तर इंग्लंडही प्रत्युत्तर देईल. त्याच्या मते, कसोटी मालिका जशी पुढे जाते, तसे काही क्षण येतात जेव्हा वातावरण तापते.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात क्रॉउली आणि डकेट यांची वेळकाढूपणा करणारी खेळी आणि त्यावर शुबमन गिल (Shubman gill & mohmmed Siraj) आणि मोहम्मद सिराज यांनी दिलेल्या प्रतिक्रिया यामुळे सामना खूप तापला होता. गिलने डकेटकडे बोट दाखवलं होतं, त्यावर डकेटनंही प्रतिक्रिया दिली होती. स्टोक्सने हे सगळं नैसर्गिक प्रतिसाद असल्याचं सांगितलं आणि ते योग्य असल्याचं मान्य केलं.

त्याचं म्हणणं होतं की, आम्ही मुद्दामहून हे प्रकार करत नाही, पण कोणी जर आमच्यावर आक्रमक झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. हे लक्ष विचलित करणारं नसावं, पण आमच्यासाठी आक्रमकपणा सोबतच मैदानावरील ऊर्जा महत्त्वाची आहे.

तसेच, त्याने कबूल केलं की भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे इंग्लंडच्या संघाला प्रेरणा मिळाली.
हॅरी ब्रूक आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने देखील टीमच्या प्रतिसादाचं कौतुक केलं.

ही कसोटी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मालिकेत सध्या इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडला या मैदानावर 2014 नंतरचा विजय हवा आहे. दुसरीकडे, दुखापतींनी त्रस्त भारतीय संघाला विजयासाठी आपल्या संघात अनेक बदल करावे लागू शकतात.

स्टोक्स म्हणाला, लॉर्ड्सवरच्या विजयाने आम्हाला आत्मविश्वास दिला . आम्ही तीच ऊर्जा ओल्ड ट्रॅफर्डवर घेऊन जाणार आहोत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---