---Advertisement---

‘स्टॉप क्लॉक’ नियमाने कसोटी क्रिकेटमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर!

On: गुरूवार, जून 26, 2025 10:56 PM
---Advertisement---

आयसीसी (ICC Cricket) क्रिकेटमध्ये अनेक बदल करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत, खास करून कसोटी फॉरमॅटमध्ये बीसीसीआय (BCCI) मोठे बदल करत आहे. आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला अनेक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी लवकरच एक मोठा नियम लागू करण्यात येऊ शकतो. ज्याला स्टॉप लॉक नियम म्हटले जात आहे. वनडे आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आधीपासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे, परंतु या नियमाने कसोटी फॉर्मेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप लागू झाल्यानंतर या फॉरमॅटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पण आता एका दिवसात 90 षटके खूप अवघड पद्धतीने फेकली जात आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी वर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये (Test cricket) ओवर रेट चर्चा खूप दिवसांपासून चालू होती. आता स्टॉप लॉक नियम आल्यामुळे संघाला नियमित वेळेवरच ठरलेली षटके टाकावी लागतील आणि जर हे संघ करू शकला नाही तर संघावर दंड अकारण्यात येऊ शकतो. सध्या आयसीसीने हा नियम कधी लागू होईल याची तारीख सांगितलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---