भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिल्लीत होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत एमएस धोनीचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्या खेळाडूंच्या यादीत कोहलीला धोनीच्या पुढे जाण्यासाठी केवळ २३ धावांची आवश्यकता आहे.
विराटने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१९ सामन्यात खेळताना ५४.१०च्या सरासरीने १५,९६१ धावा केल्या आहेत.
तसेच धोनीने ४८२ सामन्यात खेळताना ४५.१४ च्या सरासरीने १५,९८३ धावा केल्या आहेत. यात त्याची १६ शतके तर १०० अर्धशतके सामील आहेत.
विराटने पुढच्या सामन्यात जर हा विक्रम केला तर तो धोनीपेक्षा तब्बल १६२ सामने कमी खेळलेला असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ३४,३५७ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१ सचिन तेंडुलकर: ३४,३५७ धावा
२ राहुल द्रविड :२४,२०८ धावा
३ सौरव गांगुली:१८,५७५ धावा
४ वीरेंद्र सेहवाग: १७,२५३ धावा
५ एम एस धोनी:१५,९८३ धावा