ऑस्ट्रेलियात खेळला जाणार पुरूषांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup)अनेकांच्या कारकिर्दीतील शेवटचा टी20 विश्वचषक असण्याची शक्यता आहे. त्यातच काहींनी भारताचे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पण 2022चा शेवटचा टी20 विश्वचषक खेळणार आहे, अशा चर्चांना उधान आणले आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित करत असून तो कारकिर्दीत आठवा आणि कर्णधार म्हणून पहिला टी20 विश्वचषक खेळत आहे. तसेच विराटचा हा पाचवा टी20 विश्वचषक आहे, मग त्याचा हा शेवटचा असणार का याला आता पूर्णविराम लागला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याचा लहानपणीचा कोच राजकुमार शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “विराटचा हा शेवटचा टी20 विश्वचषक नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. तो मोठ्या काळापासून भारतीय संघात आहे. फॉर्म, फिटनेस आणि धावा बनवण्याची तसेच सामने जिंकण्याची भूक त्याच्यात अजूनही आहे. मला अपेक्षा आहे की तो पुढील (2026) विश्वचषकही खेळेल.”
विराटने मोठा पल्ला गाठला आहे. सगळ्यांना त्याच्या कामगिरीबाबत माहित आहे. त्याने आशिया चषक 2022मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध आतंरराष्ट्रीय टी20तील पहिले शतक केले होते. तसेच तो ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 11 टी20 सामन्यांमध्ये 64.42च्या सरासरीने 451 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहितनंतर (3737) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 109 सामन्यांमध्ये 3712 धावा केल्या आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 71 शतके केली आहेत. तसेच पहिल्या क्रमांकावर भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आहे. त्याने शतकाचे महाशतक म्हणजे 100 शतके केली आहेत.
भारतामध्ये पुढील वर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. सध्या भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
पियुष चावलाने पार केला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मैलाचा दगड! गुजरातवर सौराष्ट्रचा मोठा विजय