---Advertisement---

न्युझीलंड क्रिकेटच्या इतिहासात विल यंग झाला अजरामर!

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2025 9:04 PM
Will Young
---Advertisement---

विल यंग ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकत इतिहास रचला आहे. हे शतक फक्त यंग याच्या करिअर पुरतेच नाही तर, पूर्ण न्युझीलंड संघासाठी खास संधी आहे. पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकत यंग ने तब्बल 21 वर्षानंतर शतक ठोकणारा पहिला किवी ओपनर अशी ओळख मिळविली आहे. त्याच्या आधी साल 2004 मध्ये नाथन एस्टलने अमेरिका विरुद्ध नाबाद 154 धावा केल्या होत्या.

सामन्याच्या एक दिवस आधी पर्यंत हे ठरले न्हवते की, यंग ला प्लेइंग मध्ये स्थान देईचे की नाही. अशी शक्यता होती की, सामन्याच्या पूर्वी रचिन रवींद्र अहम फिट होईल. पण असे झाले नाही. नशिबाने यंग याची साथ दिली आणि यंग ने संधीचे सोने केले.

पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच सामन्यात दमदार शतक ठोकून यंग ने केवळ न्युझीलंड साठी मजबूत सुरुवात नाही केली तर, आपल्या विरोधकांना सुद्धा तोडीसतोड उत्तर दिले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आत्त्ता पर्यंत न्युझीलंड कडून केवळ पाच फलंदाजांनी शतक पूर्ण केले आहे. ज्यामध्ये नाथन एस्टल (2004), क्रिस केयर्न्स (2000), केन विलियमसन (2017), विल यंग (2025) और टॉम लैथम (2025) या फलंदाजांची नावे समाविष्ट आहेत.

विल यंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शानदार फॉर्म तयार केला आहे. तीन महिन्यांपूर्वी भारत विरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ बनल्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी ची एकदम जोरदार सुरुवात केली आहे. यंगचा हा डाव न्युझीलंड साठी आत्मविश्वास वाढवणारा सिद्ध होईल. व इतर खेळाडूंना यातून प्रेरणा मिळेल.

महत्वाच्या बातम्या: 

फखर झमान सलामीला का आला नाही? ‘हे’ आहे कारण…

तिकिटांची किंमत एवढी कमी तरी कराची स्टेडियम रिकामे का?

भारतीय संघ निवडीत मोठी चूक? दिनेश कार्तिकने केले प्रश्न उपस्थित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---