---Advertisement---

भारतीय संघ निवडीत मोठी चूक? दिनेश कार्तिकने केले प्रश्न उपस्थित

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2025 7:20 PM
Virat Kohli & Gautam Gambhir
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात पाच फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा शिवाय अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, भारतीय संघात 5 फिरकीपटूंची गरज होती का? तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

दिनेश कार्तिकचे म्हणणे आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय संघात पाच फिरकीपटूंची संख्या जास्त आहे. याशिवाय 4 फिरकीपटू संघामध्ये ठीक आहेत. आता हे बघणं मजेशीर असेल की, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन या फिरकीपटूंचा संघात कसा उपयोग करून घेतात.

क्रिकबज सोबत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला मला वाटते की 5 फिरकीपटू संघात जास्त आहेत. या ऐवजी 4 फिरकीपटूंना संघात घेणे योग्य होते. याशिवाय दिनेश कार्तिक असेही म्हणाला की, जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघामध्ये संधी द्यायला हवी होती. तसेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीची झलक दिसली होती.

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक म्हणाला की, हर्षित राणाला संघ व्यवस्थापनाची साथ मिळते आहे. तसेच हर्षित राणाने मोहम्मद सिराजच्या तुलनेत जास्त प्रभावी गोलंदाजी केली आहे.

आज पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात होत आहे. गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळेल. याशिवाय नंतर भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. भारत पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड संघात 2 मार्च रोजी सामना होईल.

हेही वाचा

CT 2025; पहिल्या सामन्यात किवींचा तडाखा, पाकिस्तानपुढे 320 धावांचे आव्हान!

“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 6 महिने आतंकी हल्ला, 16 वर्षांपूर्वी हादरला पाकिस्तान; जगभर बदनामी”

“हा फिरकीपटू विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल!” – रिकी पाँटिंगच्या विधानाने चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---