---Advertisement---

“हा फिरकीपटू विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल!” – रिकी पाँटिंगच्या विधानाने चर्चांना उधाण

---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या यादीत यशस्वी जयस्वालच्या जागी वरूण चक्रवर्तीला संघात सामील करण्यात आले आहे. वरूण चक्रवर्तीने इंग्लंड विरुद्ध टी 20 वनडे मालिकेत शानदार अशी गोलंदाजी केली होती. तसेच आता हे प्रश्न उपस्थित होत आहेत की, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये वरूण चक्रवर्ती त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवू शकेल का?

तत्पूर्वी या प्रश्नावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग म्हणाला की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये वरूण चक्रवर्ती विरोधी फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीने हैराण करू शकतो. त्याच्या गोलंदाजीचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर मोठा प्रभाव पडू शकतो.

रिकी पॉंटिंग आयसीसी रिव्ह्यू मध्ये म्हणाला की, वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीच्या कौशल्याने आणि विविधतेने विरोधी फलंदाजांना डोकेदुखी होऊ शकते. वरूण चक्रवर्ती मोठ्या स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची झलक दाखवण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत वरूण चक्रवर्ती मालिकेत खेळत होता. तसेच आता वरूण चक्रवर्ती शिवाय भारतीय संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर असे फिरकीपटू असणार आहेत. आधी वरूण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफी साठी संघात नव्हता. परंतु नंतर यशस्वी जयस्वालच्या जागी वरूण चक्रवर्तीला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात स्थान देण्यात आले.

आज पासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात यजमान संघ पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघ समोरासमोर असतील. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध सामने खेळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत न्यूझीलंड सामना दोन मार्च रोजी खेळला जाणार आहे.

हेही वाचा 

ज्या खेळाडूचा पाकिस्तानला अभिमान होता तोच मैदानाबाहेर गेला, दुसऱ्या चेंडूवर झाला जखमी

“हे 5 बांगलादेशी खेळाडू ठरू शकतात धोकादायक, एका क्षणात बदलू शकतात सामना!”

पाकिस्तानच्या संघात मोठी कमतरता! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रिजवानचा खळबळजनक खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---