गेल्या काही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी चे वारे वाहत आहेत. आत्ता चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. जेव्हा पासून पाकिस्तानकडे यजमानपद देण्यात आले आहे, तेव्हापासूनच सुरक्षा व्यवस्थेवरती अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बिसीसीआयने तर आपल्या संघांना सीमेच्या पलीकडे पाठवण्यास नकार दिला होता. हेच कारण आहे की, भारतीय संघ हायब्रीड मोडेलमुळे पाकिस्तान मध्ये न खेळता आपले सर्व सामने दुबई मध्ये खेळणार आहे. पाकिस्तानला आतंकवादी हल्ल्यांचा फार जुना इतिहास आहे. 16 वर्षांपूर्वी असे काही घडले होते ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात भीती पसरली होती.
2009 साली सप्टेंबर महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धा खेळल्या जाणार होत्या. त्यापूर्वी 6 महिने आधी श्रीलंका संघ पाकिस्तान दौरा करण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथे तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. वनडे मालिकेत श्रीलंकेने 2-1 असा विजय मिळवला होता. साल 2009 मध्ये 1 ते 5 मार्च दरम्यान श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार होता.
त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य केले होते की 12 आतंकवादी लिबर्टी स्क्वेअर जवळ लपून बसलेले आहेत. तेव्हा श्रीलंका संघ हॉटेल मधून गद्दाफी स्टेडियम कडे रवाना झाला होता. तेवढ्यात गोळीबार सुरू झाला. पाकिस्तान पोलिसांनी पलटवार करत गोळ्या झाडल्या पण त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला आणि दोन साधारण नागरिकांचा जीव गेला. पुढील 20 मिनिटानंतर आतंकवादी रॉकेट लाऊंचर सोडून पळून गेले होते.
या हल्ल्यात श्रीलंकेचे थिलन समरवीरा, कुमार संगाकारा, महेला जयवर्धने, थरंगा परानाविताना, अजंता मेंडिस, चामिंडा वास और सुरंगा लकमल हे जखमी झाले होते. समरवीरा और परानावितानाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचबरोबर अन्य खेळाडू गंभीर जखमी नाही झाले परंतु त्यांना थोडंफार खरचटलेल्या खुणा होत्या. घटनेनंतर श्रीलंका संघाला मैदानवरती हेलिकॉ्प्टर बोलवून घटनास्थळावरून दूर नेण्यात आले. आणि लगेचच त्यांना श्रीलंकेमध्ये परत पाठविण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
“हा फिरकीपटू विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल!” – रिकी पाँटिंगच्या विधानाने चर्चांना उधाण
ज्या खेळाडूचा पाकिस्तानला अभिमान होता तोच मैदानाबाहेर गेला, दुसऱ्या चेंडूवर झाला जखमी
पाकिस्तानच्या संघात मोठी कमतरता! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच रिजवानचा खळबळजनक खुलासा






