इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड संघ ९ षटकात १ बाद ३६ धावा अशा स्थितीत आहे. इंग्लंडचे ऍलेक्स हेल्स आणि ओली पोप फलंदाजी करत आहे. इंग्लंडला विजयासाठी २६३ धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडच्या दुसऱ्या व सामन्यातील तिसऱ्या डावादरम्यान लक्षवेधी प्रसंग घडला. न्यूझीलंडचा शतकवीर डॅरिल मिचेल आणि सलामीवीर विल यंग यांच्यातील गोंधळामुळे यंग धावबाद झाला. या प्रसंगाचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने शेअर केला आहे.
विल यंग (Will Young) वैयक्तिक ५६ धावांवर धावबाद झाला. त्याला इंग्लंडचे खेळाडू ओली पोप (Ollie Pope) आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी मिळून धावबाद केले.
त्याचे झाले असे की, न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील ४३व्या षटकातील दुसरा चेंडू विल यंगने स्क्वेयर लेगच्या दिशेला खेळला. स्क्वेयर लेगला ओली पोप क्षेत्ररक्षण करत होता. विल यंगने फटका मारल्यानंतर तो एक धाव घेण्यासाठी पळायच्या तयारीत होता. परंतु खेळपट्टीच्या अर्ध्यात आल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षक ओली पोपला चेंडू पकडल्याचे पाहिले आणि तो खेळपट्टीच्या अर्ध्यातच काही सेकंद थांबला. मात्र तिकडून नॉन स्ट्राईकवरील फलंदाज डॅरिल मिचेल वेगाने धावत आला होता. त्यामुळे विल यंगलाही धाव पूर्ण (Will Young Runout) करण्यासाठी पळावे लागले.
Well well well…
Scorecard & Videos: https://t.co/GJPwJC59J7
🏴 #ENGvNZ 🇳🇿 pic.twitter.com/d87PxkejeY
— England Cricket (@englandcricket) June 13, 2022
इकडे क्षेत्ररक्षक ओली पोपने चेंडू पकडल्यानंतर तोही सुरुवातीला चेंडू नेमका कोणत्या बाजूला थ्रो करावा, यामध्ये गोंधळल्याचे दिसले. त्याने डॅरिल मिचेल धावत असलेल्या स्ट्राईकर बाजूकडे चेंडू फेकण्याचा विचार केला. परंतु मिचेल खेळपट्टीवरील सीमारेषेच्या बराच नजीक आल्याने त्याने आपला निर्णय बदलला. त्याने त्वरित नॉन स्ट्राईकर बाजूकडे चेंडू फेकला. तिथे आधीपासूनच बेन स्टोक्स उभा होता. स्टोक्सने त्वरित चेंडू पकडला आणि क्षणात यष्टीला मारला. फलंदाज विल यंगने डाईव्ह मारत स्वतची विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. अशाप्रकारे विल यंगला ११३ चेंडूंचा सामना केल्यानंतर ५६ धावांवर विकेट गमवावीर लागली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव
रिषभ पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू संघाचा कर्णधार असता तर भारत आज मालिकेत आघाडीवर असता…
सीरिज पाकिस्तान- विंडीजची अन् फटका बसलाय भारताला, वनडे रँकिंगमध्ये खाल्ल्या गटांगळ्या