लंडन। रविवारी (१० जुलै) विम्बल्डन २०२२ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस (Nick Kyrgios) याचा पराभव करत कारकिर्दीतील २१ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या शर्यतीत जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. फेडररने आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या यादीत स्पेनचा राफेल नदाल २२ ग्रँडस्लॅमसह अव्वल स्थानावर आहे.
जोकोविचचे हे एकूण ७वे विम्बल्डन विजेतेपद ठरले आहे. त्यामुळे त्याने विलीयम रेनशॉं(७) आणि पीट सँप्रास (७) यांची बरोबरी केली आहे. सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपदं जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडरर(८) अव्वल स्थानावर आहे. जोकोविचने २०११, २०१४, २०१५,२०१८,२०१९, २०२१ आणि २०२२ या सात वर्षी विम्बल्डन विजेतीपदं जिंकली आहेत.
वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळताना सर्बियाच्या जोकोविचने किर्गियोसला ४-६, ६-३, ६-४, ७(७)-६(३) असे सलग तीन सेटमध्ये पराभूत केले. जोकोविचचा कारकिर्दीतील हा ३२ वा ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना होता. तर २७ वर्षीय किर्गियोस हा कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना होता.
Magnificent.
In its 100 years, Centre Court has seen few champions like @DjokerNole#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/vffvL2f08Q
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2022
किर्गियोसने पहिल्या सेटमध्ये उत्तम सर्विस करत सेट ६-४ असा जिंकला होता. मात्र त्याला लय कायम राखता आली नाही. जोकोविचनने दुसरा आणि तिसरा सेट सहज आपल्या नावे केला. अंतिम सेटमध्येही किर्गियोसने चांगली लढत दिली पण ती अपूरी पडली.
जोकोविच, फेडरर आणि नदाल या तिघांच्या नावावर वर्षाच्या सुरूवातीला २०-२० ग्रँडस्लॅम होती. नदालने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेचं ओपन जिंकत आघाडी घेतली. तो विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून दुखापतीमुळे बाहेर पडला.
????#Wimbledon | #CentreCourt100 | @DjokerNole pic.twitter.com/Y6K5hPs58K
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2022
किर्गियोस हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना खेळत होता. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदालशी होणार होता, मात्र नदालने माघार घेतल्याने किर्गियोस थेट अंतिम फेरीत पोहोचला होता. क्रमवारीत ४०व्या स्थानावर असलेल्या किर्गियोसने गोरान इवानिसेविच सारखे चॅम्पियन होण्याचा प्रयत्न केला होता. २००१ मध्ये झालेल्या विम्बल्डनमध्ये जिंकलेले इवानिसेविच हे बिगर मानांकित होते. या सामन्यात जोकोविचचा अनुभव कामी आला. सध्या इवानिसेविच हे जोकोविचचे प्रशिक्षक आहेत. ते कोर्टवर उपस्थित देखील होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच वादा, सूर्या दादा! झंझावाती शतक करत सूर्यकुमारने जिंकली मने, ठरला पाचवाच भारतीय
ना ना करते प्यार कर बैठे! मुथैय्या मुरलीधरनची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी
‘सिक्सर किंग’च्या संघापुढेच लिविंगस्टोनने मारला ८० मीटरचा षटकार, व्हिडिओ तुफान व्हायरल





